दुबई, 21 ऑक्टोबर : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2020) किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) सध्या आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर मंगळवारी पंजाबनं अव्वल स्थानी असलेल्या दिल्लीला 5 विकेटनं पराभूत केले. यासह पंजाबचा संघ थेट पाचव्या क्रमांकावर आला आहे. पंजाब संघाचे आता 8 गुण झाले आहेत. पंजाबने 10 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर दिल्ली मात्र पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दिल्लीने 10 पैकी 7 सामने जिंकले असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
दिल्ली कॅपिटल्सनं या सामन्यात पंजाबला 168 धावांचे आव्हान दिले होते. निकोलस पूरनने केलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर पंजाब (KXIP)ने दिल्ली (Delhi Capitals)चा 5 विकेटने पराभव केला आहे. दिल्लीने ठेवलेल्या 168 रनच्या आव्हानाचा पाठलाग पंजाबने 19 ओव्हरमध्ये पूर्ण केला. दिल्लीचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. फॉर्ममध्ये असलेले केएल राहुल आणि मयंक अग्रवाल लवकर माघारी परतले. राहुल 15 तर मयंक 5 रनवर आऊट झाले. यानंतर क्रिस गेलने 13 बॉलमध्ये 28 तर निकोलस पूरनने 28 बॉलमध्ये 53 रन केले. यंदाच्या मोसमात फॉर्मसाठी संघर्ष करणाऱ्या मॅक्सवेलनेही 24 बॉलमध्ये 32 रन करुन मोलाची मदत केली. दीपक हुडा 15 रनवर नाबाद आणि जेम्स नीशम 8 रनवर नाबाद राहिले.
वाचा-IPL 2020 : 'थाला' म्हणणाऱ्या चाहतीला केएल राहुल म्हणाला...
A look at the Points Table after Match 38 of #Dream11IPL pic.twitter.com/SYfSXoIumI
— IndianPremierLeague (@IPL) October 20, 2020
वाचा-IPL 2020 : पूरनचं धडाकेबाज अर्धशतक, पंजाबचा दिल्लीवर विजय
आयपीएल गुणतालिकेत सध्या दिल्ली कॅपिटल्स 14 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर गतविजेता मुंबईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मंबईचे 12 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीच्या बॅंगलोर संघ आहे. बॅंगलोरकडेही 12 गुण आहेत. मात्र पंजाबच्या या विजयानंतर KKR, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि CSK या संघाच्या चिंता वाढल्या आहेत. कारण पंजाबचा रन रेटही चांगला आहे.
वाचा-IPL 2020 : दुबईच्या समुद्रावर चहलचा धनश्रीसोबत Photo, पण डिव्हिलियर्स ट्रोल
कोलकाताचा संघ चौथ्या स्थानावर असला तरी त्यांना प्ले ऑफ गाठण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील. तर राजस्थानचा संघ 8 गुणांसह सहाव्या स्थानी आणि हैदराबाद सातव्या स्थानी आहे. चेन्नई सुपरकिंग्जचास संघ आठव्या स्थानी आहे.