स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020: मंदीच्या काळात पैशांचा पाऊस! वाचा ऑरेंज-पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंचा बंँक बॅलन्स कितीने वाढला

IPL 2020: मंदीच्या काळात पैशांचा पाऊस! वाचा ऑरेंज-पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंचा बंँक बॅलन्स कितीने वाढला

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या ट्रॉफीवर पाचव्यांदा नाव कोरलं असलं तरीही यंदा पर्पल कॅप (Purple Cap) आणि ऑरेंज कॅप (Orange Cap) चा मान अनुक्रमे दिल्ली आणि पंजाब टीममधील खेळाडूंना मिळाला आहे

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर: आयपीएल 2020 (IPL 2020) हा हंगामही रोमांचक होता, काही सामने तर शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक होते. फायनल मध्ये मात्र मुंबईच्या (Mumbai Indians) संघाने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना सहज खिशात घातला. पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरणाऱ्या मुंबईच्या संघातील प्रत्येक खेळाडूने या विजयासाठी योगदान दिले आहे. यावर्षीच्या आयपीएल फायनलमध्ये मुंबईने दिल्ली (Delhi Capitals)चा 5 विकेटने पराभव केला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने दिल्लीने दिलेलं 157 रनचं आव्हान 5 विकेट गमावून 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मात्र पर्पल कॅप (Purple Cap) आणि ऑरेंज कॅप (Orange Cap) मुंबई नाही तर अनुक्रमे दिल्ली आणि पंजाबच्या टीममधील खेळाडूंनी जिंकली आहे.

दरम्यान यंदाच्या हंगामातील अंतिम सामन्यानंतर खेळाडूंवर पैशाचा पाऊस पडला आहे. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकलेल्या खेळाडूंनी चांगलीच कमाई केली आहे. ऑरेंज कॅप मिळवण्यात के एल राहुल यशस्वी झाला आहे.

मुंबईविरुद्धच्या आयपीएल फायनलमध्ये 13 बॉल खेळून 15 रन करणाऱ्या शिखर धवन (Shikhar Dhawan) याचं ऑरेंज कॅप जिंकण्याचं स्वप्न यावर्षी अपूर्ण राहिलं आहे. ही ऑरेंज कॅप पंजाब (KXIP)चा कर्णधार केएल राहुल याने पटकावली. केएलने या हंगामात सर्वाधिक म्हणजेच 670 रन्स केल्या आहेत. यंदाचा पहिलाच सीझन आहे ज्यामध्ये लोकश राहुलने ऑरेंज कॅप जिंकली आहे. या कामगिरीनंतर केएल राहुलला 10 लाखांचा चेक मिळाला आहे.

(हे वाचा-IPL 2021मध्ये होणार आतापर्यंतचा सर्वात मोठा लिलाव! 8 नाही तर खेळणार 9 संघ)

याशिवाय सर्वात जास्त 30 विकेट्स पटकावल्या आहे दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा (Kagiso Rabada) याने. त्याने पर्पल कॅप जिंकली आहे. रबाडाच्या भेदक गोलंदाजीने भल्याभल्यांनी माघारी पाठवले होते. या कामगिरीनंतर रबाडाने 10 लाख रुपयांचा चेक मिळवला आहे. दरम्यान या हंगामात इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड देवदत्त पडिक्कलला मिळाला आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 11, 2020, 5:28 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या