VIDEO: 'विराट आणि एबीला बॅन करा', RCBविरुद्ध सामन्याआधी केएल राहुलनं केली मागणी

VIDEO: 'विराट आणि एबीला बॅन करा', RCBविरुद्ध सामन्याआधी केएल राहुलनं केली मागणी

आज किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (Royal Challengers Banglore) यांच्यात शारजामध्ये सामना होणार आहे.

  • Share this:

शारजा, 15 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) सर्व संघांचे 7 ते 8 सामने झाले आहेत. त्यामुळे आता प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी सर्व संघांमध्ये स्पर्धा आहे. यात आज किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (Royal Challengers Banglore) यांच्यात शारजामध्ये सामना होणार आहे. पंजाब संघाला या हंगामात चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. पंजाबनं 7 पैकी केवळ 1 सामना जिंकला आहे, त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे गरजेचे आहे. तर, विराट कोहलीचा RCB संघ 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना 2 गुणांची गरज आहे.

आज होणाऱ्या या सामन्यात पंजाबकडून युनिव्हर्सल बॉस गेल (chris Gayle) खेळण्याची शक्यता आहे. मात्र या सामन्याआधी विराट कोहली आणि केएल राहुल एका ऑनलाइन मुलाखतीत एकत्र होते. यावेळी केएल राहुलनं, विराट आणि ए बी डिव्हिलियर्स यांना बॅन करण्याची मागणी केली आहे. केएल राहुल आणि विराट कोहली पुमा इंडिया इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान एकमेकांशी गप्पा मारत होते.

वाचा-कल्याण-डोबिंवलीकरांनी राजस्थानला हरवलं! हा मुंबई इंडियन्सचा नाही तर दिल्लीचा संघ

या कार्यक्रमादरम्यान विराट कोहलीनं राहुललं, "जर तुला तुझ्या फायद्यासाठी टी-20 क्रिकेटमध्ये एक नियम बदली करायचा असेल तर तो कोणता असेल?". यावर केएल राहुलनं, "मी IPL कडे अशी मागणी करेन की विराट आणि एबीला बॅन करा". यावर विराटही खळखळून हसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-IPL 2020 : 12.5 कोटींचा कर्णधार सुपरफ्लॉप, टीममधून बाहेर काढण्याची मागणी

एवढेच नाही तर राहुल कोहलीला असंही म्हणाला की, "तुम्ही जेव्हा एका जागी पोहचता आणि 5 हजार धावा करता. तेव्हा तुम्ही थोडं थांबावं, इतर खेळाडूंना खेळू द्यावं". राहुलनं नियमांमध्ये बदल करण्याबाबत असे सांगितले की, "जर एखादा फलंदाज 100 मीटर पेक्षा उंच षटकार मारत असेल तर त्याला जास्त धावा द्याव्यात". मात्र यावर विराट कोहलीनं राहुलला ट्रोल केलं. विराट म्हणाला की, "हे तू तुझ्या गोलंदाजांचा विचार करून बोल". मुख्य म्हणजे पंजाबनं आपला एकमेव सामना बॅंगलोरविरुद्धचा जिंकला आहे.

वाचा-बापरे बाप! 'या' गोलंदाजानं ट्रेनलाही टाकलं मागे, 156 KM/HR वेगानं केली गोलंदाजी

याआधी बॅंगलोरविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलनं 69 चेंडूत 132 धावांची तुफानी खेळी केली होती. आज सायंकाळी 7.30 वाजता बॅंगलोर आणि पंजाब यांच्यात शारजामध्ये सामना होणार आहे. शारजा मैदान लहान असल्यामुळे आजच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.

Published by: Priyanka Gawde
First published: October 15, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading