दुबई, 21 ऑक्टोबर : कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कर्णधार दिनेश कार्तिकनं आपलं कर्णधारपद सोडलं आहे. त्यानंतर आता इऑन मॉर्गन याच्याकडे कर्णधारपद देण्यात आलं आहे. मात्र कार्तिकच्या या निर्णयावर माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर खुश नाही आहे. 16 ऑक्टोबरला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याआधी कार्तिकने कर्णधारपद सोडत एकदिवसीय वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघाचा कर्णधार इऑन मॉर्गनकडे ही जबाबदारी दिली होती. आपल्या बॅटिंगवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असल्याचं कारण देत कार्तिक पायउतार झाला होता.
यावर अजित आगरकर म्हणाला, कोलकाता नाईट रायडर्सचे सात सामने झाले आहेत. त्याचबरोबर संघ पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर असताना असा निर्णय घेणं मला बरोबर वाटत नाही.
वाचा-KKRच्या 'या' स्टार खेळाडूनं दिली गोड बातमी, लवकरच होणार बाबा!
स्टार स्पोर्ट्सच्या फॅन वीक या कार्यक्रमात बोलताना आगरकर म्हणाला, या निर्णयामुळं संघ विस्कळीत होऊ शकतो. त्याचबरोबर खेळाडूंच्या जबाबदारीवर आणि खेळावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडल्यानंतर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात कोलकात्याला मुंबईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात कोलकात्याला केवळ 148 धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना मुंबईने डिकॉकच्या 78 धावांच्या खेळीच्या जोरावर आठ विकेट राखून विजय मिळवला.
वाचा-IPL 2020 : वर्षाआधी आयसीसीने घातली होती बंदी, आता गाजवतोय आयपीएल
एखाद्या खेळाडूला कर्णधार केल्यानंतर तुम्ही त्याच्याबरोबर एका वर्षाचा प्लॅन तयार करत असता. त्यामुळे मोसमाच्या मध्येच कर्णधार बदलणं हा निर्णय मला खूप विचित्र वाटला असंही अजित म्हणाला.
Abu Dhabi will play host to Match 39 of #Dream11IPL as #KKR will square off against #RCB
Preview by @ameyatilak https://t.co/8v4XKEhT2g #Dream11IPL pic.twitter.com/T8k1cevRTr
— IndianPremierLeague (@IPL) October 21, 2020
वाचा-4 4 6 4 6 Wd 1! पाचव्या ओव्हरमध्ये गोलंदाजाकडे बघत बसला श्रेयस अय्यर, पाहा VIDEO
मुंबईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये उत्तम विजय मिळवत केकेआऱनी चांगलं पुनरागमन केलं आहे. त्यानंतर आज त्यांचा सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध होणार आहे.