मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

KKRला मोठा झटका, 'या' मॅन विनिंग खेळाडूची गोलंदाजी शैली ठरली आक्षेपार्ह; होणार बॅन?

KKRला मोठा झटका, 'या' मॅन विनिंग खेळाडूची गोलंदाजी शैली ठरली आक्षेपार्ह; होणार बॅन?

KKRच्या या गोलंदाजाची शैली आक्षेपार्ह असल्याची तक्रार मैदानावरील पंच उल्हास गांधी आणि क्रिस गाफाने यांनी केली आहे. यासंबंधी दोघांनी एक रिपोर्ट तयार केला आहे.

KKRच्या या गोलंदाजाची शैली आक्षेपार्ह असल्याची तक्रार मैदानावरील पंच उल्हास गांधी आणि क्रिस गाफाने यांनी केली आहे. यासंबंधी दोघांनी एक रिपोर्ट तयार केला आहे.

KKRच्या या गोलंदाजाची शैली आक्षेपार्ह असल्याची तक्रार मैदानावरील पंच उल्हास गांधी आणि क्रिस गाफाने यांनी केली आहे. यासंबंधी दोघांनी एक रिपोर्ट तयार केला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

दुबई, 11 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) एकीकडे सर्व संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कोलकाता संघाचा स्टार फिरकी गोलंदाज सुनील नारायण (Sunil Narine) याची किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात आक्षेपार्ह गोलंदाजी शैलीचा (Illegal Action) आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनील नारायणची तपासणी केली जाईल. याआधीही एकदा सुनील नारायणची गोलंदाजी आक्षेपार्ह असल्याचा आरोप करण्यात आला होता.

बीसीसीआयच्या नियमांनुसार सुनील नारायणची गोलंदाजी शैली आक्षेपार्ह असल्याची तक्रार मैदानावरील पंच उल्हास गांधी आणि क्रिस गाफाने यांनी केली आहे. यासंबंधी दोघांनी एक रिपोर्ट तयार केला आहे. याआधीही सुनील नारायणला चेतावणी देण्यात आली होती. त्यामुळे जर दुसर्‍यांदा उल्लंघनाबद्दल दोषी ठरवले तर सुनील नारायणला आयपीएलमध्ये गोलंदाजी करता येणार नाही.

वाचा-झगमगाटापासून लांब चेतेश्वर पुजारा चाहत्यांना म्हणतोय 'थॅंक्स', कारण...

इंडियन प्रीमियर लीगनं जारी केलेल्या निवेदनानुसार, "कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू सुनील नारायण याच्यावर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यादरम्यान आक्षेपार्ह शैलीनं गोलंदाजी केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत आता पुढील तपास करून निर्णय घेण्यात येईल", असे सांगण्यात आले आहे. हा अहवाल ऑन-फील्ड पंच उल्हास गांधी आणि ख्रिस गफने यांनी तयार केला आहे. दरम्यान सुनील नारायण हा KKR साठी मॅच विनिर खेळाडू आहे.

वाचा-IPL 2020 : राहुल-मयंकची शतकी पार्टनरशीपही व्यर्थ, पंजाबचा पराभवांचा 'सिक्सर'

पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यातही सुनीलनं 2 विकेट घेतल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत सामना 2 धावांनी जिंकला. कोलकाता (KKR)विरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा 2 रननी पराभव झाला आहे. कोलकात्याने ठेवलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे ओपनर केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांनी शतकी पार्टनरशीप केली. या दोघांनी 14.2 ओव्हरमध्ये 115 रन केले, पण तरीही पंजाबला हे आव्हान पार करता आलं नाही.

वाचा-IPL 2020 : धोनी नव्या अवतारात ! 'माही'चा हा लूक बघितलात का?

कोलकात्याविरुद्धच्या या पराभवासोबतच पंजाबचं प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न आणखी कठीण झालं आहे. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या 7 मॅचपैकी फक्त एकच मॅच जिंकली आहे, तर उरलेल्या 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्येही पंजाबची टीम शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे कोलकात्याचा यंदाच्या मोसमातला हा चौथा विजय आहे. आतापर्यंत खेळलेल्या 6 मॅचपैकी 2 मॅचमध्ये कोलकात्याच्या पराभव स्वीकारावा लागला आहे.

First published: