Home /News /sport /

VIDEO: 40 ओव्हरचा सामना 12 चेंडूत संपला! फक्त 6 मिनिटांत पाहा डबल सुपर ओव्हरचा थरार

VIDEO: 40 ओव्हरचा सामना 12 चेंडूत संपला! फक्त 6 मिनिटांत पाहा डबल सुपर ओव्हरचा थरार

IPL 2020 KXIP vs MI: असा सामना होणे नाही! 252 चेंडूनंतरही संपला नाही सामना; क्रिकेट चाहत्यांनी अजिबात मिस करू नये असा VIDEO

    दुबई, 19 ऑक्टोबर :आयपीएलचा तेरावा हंगाम (IPL 2020) चाहत्याचं मनोरंजन करण्यात कोणतीही कमी सोडत नाही आहेत. मात्र रविवारचा दिवस क्रिकेट इतिहासामधला खास दिवस होता. कारण एकाच दिवसात तीन सुपरओव्हर पाहायला मिळाल्या. डबल हेडरमध्ये कोलकाता नाइट राइडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध झालेल्या सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. मुख्य म्हणजे दोन्ही सामने सुपरओव्हरमध्ये गेले. मुंबई आणि पंजाब यांच्यात तर दोन सुपरओव्हर झाला आणि अखेर सामन्याचा निकाल लागला. म्हणजे तब्बल 252 चेंडू खेळल्यानंतरही निकाल न लागलेला सामना अखेर 12 चेंडूत संपला. सुरुवातील मुंबईने ठेवलेल्या 177 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 176 रनच करता आल्या. या लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या पंजाबची सुरुवात फार चांगली झाली नाही. ओपनर मयंक अग्रवाल 11 रन करून माघारी परतला. यानंतर केएल राहुलने पहिले क्रिस गेल आणि मग निकोलस पूरनबरोबर फटकेबाजी सुरूच ठेवली. राहुल 51 बॉलमध्ये 77 रन करून आऊट झाला, तर गेल आणि निकोलस पूरनने प्रत्येकी 24-24 रन केले. वाचा-6 सामने गमावूनही पंजाब गाठणार प्ले ऑफ? पॉइंट टेबलमध्ये झाला मोठा बदल पंजाबला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 9 रनची गरज होती आणि मैदानात क्रिस जॉर्डन आणि दीपक हुडा होते. पण ट्रेन्ट बोल्टने फक्त 8 रन देऊन सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. वाचा-IPL 2020 : ...म्हणून रोहित शर्मा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला आला नाही पहिली सुपर ओव्हर पंजाब आणि मुंबईच्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर पंजाबला 5 रनच करता आल्या, त्यामुळे मुंबईला विजयासाठी 6 रनचं आव्हान मिळालं. पंजाबने सुरुवातीला केएल राहुल आणि निकोलस पूरनला बॅटिंगला पाठवलं, पण निकोलस पूरन दुसऱ्याच बॉलला आऊट झाला, यानंतर दीपक हुडा बॅटिंगला आला, पण त्यालाही चमक दाखवता आली नाही. बुमराहच्या शेवटच्या बॉलवर केएल राहुल आऊट झाला. पंजाबने दिलेलं हे आव्हान पार करताना मुंबईची दमछाक झाली. शमीनं यॉर्कर टाकत मुंबईला चकवलं. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना केएल राहुलनं डी कॉकला रन आऊट केलं आणि पुन्हा सामना सुपर ओव्हर झाला. वाचा-IPL 2020 : एक दिवस तीन सुपर ओव्हर, रोमांचक सामन्यात पंजाबचा मुंबईवर विजय दुसरी सुपर ओव्हर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने पोलार्ड आणि हार्दिक पांड्याला बॅटिंगला पाठवलं, तर पंजाबने क्रिस जॉर्डनला बॉलिंग दिली. मुंबईने या 6 बॉलमध्ये 11 रन केले. शेवटच्या बॉलवर मयंक अग्रवालने जबरदस्त फिल्डिंग करत सिक्स वाचवली आणि मुंबईला फक्त 2 रनच मिळाल्या. या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने हार्दिक पांड्या आणि पोलार्ड ओपनिंगला आले. हार्दिक पांड्याची विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादव बॅटिंगला आला. पाचव्या बॉलवर अंपायरने पोलार्डला आऊट दिलं, पण त्याने डीआरएस घेतला आणि थर्ड अंपायरने पोलार्डला नाबाद घोषित केले. मुंबईने 12 रनचं आव्हान रोखण्यासाठी ट्रेन्ट बोल्टला बॉलिंग दिली, तर पंजाबकडून क्रिस गेल आणि मयंक अग्रवाल बॅटिंगला आले. बोल्टच्या पहिल्याच बॉलला गेलने सिक्स मारला, तर दुसऱ्या बॉलला गेलने एक रन काढली. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर मयंक अग्रवालने फोर मारून पंजाबला जिंकवलं.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Kl rahul, Mumbai Indians, Rohit sharma

    पुढील बातम्या