मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

…म्हणून IPLमध्ये चांगली कामगिरी करू शकत नाही आहे मॅक्सवेल, स्वत: सांगितलं कारण

…म्हणून IPLमध्ये चांगली कामगिरी करू शकत नाही आहे मॅक्सवेल, स्वत: सांगितलं कारण

युएइमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा रेकॉर्ड चांगला आहे. 2014मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना मॅक्सवेलनं तुफान फलंदाज केली होती.

युएइमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा रेकॉर्ड चांगला आहे. 2014मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना मॅक्सवेलनं तुफान फलंदाज केली होती.

IPL लिलावात 10 कोटी 75 लाखांना विकत घेतलेला मॅक्सवेल या कारणामुळे होतोय फेल! समोर आलं कारण.

  • Published by:  Priyanka Gawde
दुबई, 15 ऑक्टोबर : किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) चांगली कामगिरी करत नाही आहे. आयपीएलआधी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात मॅक्सवेलनं चांगली कामगिरी केली होती. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये त्यानं केवळ 14.5 च्या सरासरीने 58 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज म्हणून मॅक्सवेल प्रसिद्ध आहे. मात्र, वारंवार भूमिका बदलल्यामुळे आयपीएलमध्‍ये खेळ खराब होत असल्याचं त्यांचं मत आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळत असताना त्याची भूमिका अगदी स्पष्‍ट असते. इंग्लड दौऱ्यावर असताना त्याने चांगले प्रदर्शन केलं. या दौऱ्यात सातव्या नंबरवर फलंदाजी करताना 90 चेंडूंत 108 धावा केल्या. वाचा-एका विकेटची किंमत 7.75 कोटी तर एक रन 18 लाखांचा! ही आकडेवारी वाचून व्हाल हैराण दुबई येथे पीटीआयशी बोलताना मॅक्सवेलने सांगितले की, ऑस्ट्रेलियाकडून खेळत असताना त्याला आपल्यातील क्षमतांची जाणीव झाली.आयपीएलमध्‍ये चांगल्या कामगिरीत सातत्य नसण्याबद्दल तो म्हणाला, आयपीएल आणि ऑस्ट्रेलिया यातील करिअरची मी तुलना करणार नाही. मी ज्या पद्धतीने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट खेळतो आहे, त्याला कारणीभूत माझी संघातील स्पष्ट भूमिका आहे. तिथं मी संघासाठी खेळताना कुठल्या भूमिकेतून खेळायचे आहे हे स्पष्ट असते. त्यामुळे त्या खेळाची आयपीएलशी तुलना होऊ शकत नाही. वाचा-IPL 2020 मध्ये मुंबईची कामगिरी उत्तम, जिंकण्यासाठी काय असेल रोहित शर्माची रणनीती आयपीएलमध्‍ये अपयश गेल्या वर्षी मानसिक आरोग्याशी झगडत असतानाही मॅक्सवेलनं आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट करिअरमध्‍ये चांगलं प्रदर्शन केलं होतं. मात्र, आयपीएलमध्‍ये तो सातत्याने अपयशी ठरला. यंदाच्या सत्रात सात सामन्यांत त्याने केवळ 58 धावा केल्या आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबने या वेळी लिलावात त्याला 10 कोटी 75 लाख रुपयांत खरेदी केलं आहे. आयपीएलमध्‍ये प्रत्येक सामन्‍यावेळी आपली भूमिका बदलते, त्यामुळे आयपीएलमधील कामगिरीवर परिणाम झाल्याचे मॅक्सवेलनं सांगितले. आयपीलएलमध्ये मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो.आयपीएलमध्‍ये आम्ही केवळ दोन महिने एकत्र असतो. यात अनेक बदल होतात. त्यामुळे एक भूमिका निश्चित असणं अत्यंत महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. मॅक्सवेलच्या कामगिरीमुळे गेलनं संघात पुनरागमन केल्यास त्याची जागी धोक्यात आहे.
First published:

पुढील बातम्या