नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : आयपीएलच्या (IPL 2020) या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitlas) संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. 14 गुणांसह दिल्लीचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र दिल्ली संघावर दुखापतींचे सावट असल्याचे दिसत आहे. संघातील खेळाडू एक-एक करून आयपीएलमधून बाहेर पडत आहेत. याआधी गोलंदाज इशांत शर्मानं (Ishant Sharma) दुखापतीमुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला. आता अमित मिश्राही (Amit Mishra) दुखापतीमुळे आयपीएल बाहेर गेला आहे. दरम्यान अमित मिश्राला बदली म्हणून दिल्लीनं एका 27 वर्षीय गोलंदाजाला संधी दिली आहे.
लेग स्पिनर अमित मिश्रा जखमी झाल्यानंतर आता दिल्ली संघानं RCBमध्ये असलेल्या प्रवीण दुबेला संघात घेतलं आहे. अमित मिश्रा शारजामध्ये कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना जखमी झाला होता. त्यामुळे अमित मिश्राला आयपीएल बाहेर जावे लागले. आता त्याच्या जागी प्रवीण दुबे दिल्लीकडून खेळणार आहे. प्रवीण दुबेला 2016मध्ये रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरनं संघात घेतले होते.
वाचा-ठरलं! 'या' दोन संघांमध्ये होणार IPL फायनल, युवीच्या भविष्यवाणीनं घाबरली RCB
📣 ANNOUNCEMENT 📣
Following @MishiAmit's injury that ruled him out of the tournament, we've secured the services of leg-spinner Pravin Dubey as his replacement for the remainder of the #Dream11IPL season.
Read more: https://t.co/NlvToC9FkX#YehHaiNayiDilli pic.twitter.com/Nwr4KLFn7H
— Delhi Capitals (Tweeting from 🇦🇪) (@DelhiCapitals) October 19, 2020
वाचा-40 ओव्हरचा सामना 12 चेंडूत संपला! फक्त 6 मिनिटांत पाहा डबल सुपर ओव्हरचा थरार
प्रवीण दुबे कर्नाटक स्थानिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करून चर्चेत आला होता. त्यानं 14 स्थानिक सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी 6.87च्या आसपास आहे.
वाचा-6 सामने गमावूनही पंजाब गाठणार प्ले ऑफ? पॉइंट टेबलमध्ये झाला मोठा बदल
अजमगडमध्ये जन्मलेला 24 वर्षीय प्रवीण दुबेनं कर्नाटक प्रीमिअर लीगमध्येही चांगली कामगिरी केली होती. त्यानं 2015-16मध्ये 8 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे दिल्लीकडून प्रवीण दुबेला संधी मिळणार की नाही, हे येत्या सामन्यांमध्ये कळेलच. दुसरीकडे संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतही सध्या जखमी आहे. पंतच्या जागी सध्या संघात अजिंक्य रहाणेला जागा देण्यात आली आहे, मात्र रहाणेला अद्याप चांगली कामगिरी करता आली नाही.