मुंबई, 27 जानेवारी : इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या स्पर्धा 29 मार्चला सुरू होणार आहेत. आयपीएलचा अंतिम सामना 24 मे रोजी मुंबईत होईल अशी माहिती बीसीसीयआचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. आयपीएलच्या 13 व्या हंगामातवेळी झालेल्या बैठकीत अंतिम सामना मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यंदा एकाच दिवशी दोन सामने खेळवण्याचे प्रमाणही कमी केले आहे. तसेच डे-नाइट सामन्याच्या वेळेतबाबतही निर्णय घेतला गेला.
आयपीएलच्या 13 व्या हंगामात अंतिम सामना अहमदाबादला होईल असं म्हटलं जात होतं. मात्र अंतिम सामन्यासाठी मुंबईवर शिक्का मोर्तब करण्यात आलं आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. तसेच सामन्यांची वेळ रात्री 8 वाजता निश्चित करण्यात आली आहे. सामने रात्री साडेसात वाजता सुरु करण्याचीही मागणी करण्यात आली होती मात्र वेळेत बदल न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
BCCI president Sourav Ganguly: The final match of the Indian Premier League (IPL) will be played in Mumbai. pic.twitter.com/wEOSMAwpf4
एकाच दिवशी दोन सामने खेळवण्याचे प्रमाण कमी करण्याबाबतही निर्णय़ घेतला. या हंगामात पाच दिवस दररोज दोन सामने होतील. रात्रीच्या सामन्याची वेळ आणि एकाच दिवशी दोन सामने खेळवण्याचे प्रमाण या दोन्हींवर बैठकीत चर्चा झाली. यात साडेसातला सामने सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली नाही.