मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2020 : ग्लेन मॅक्सवेलचा फ्लॉप शो सुरूच, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

IPL 2020 : ग्लेन मॅक्सवेलचा फ्लॉप शो सुरूच, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

आयपीएल (IPL 2020) मध्ये सनरायजर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब (KXIP) ला आणखी एका पराभवाचा धक्का लागला.  या स्पर्धेत पंजाबला मोठी रक्कम मोजून घेतलेल्या ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) कडून  मोठी अपेक्षा होती. पण मॅक्सवेलचा फ्लॉप शो सुरूच आहे, त्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

पुढे वाचा ...

दुबई, 10 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये सनरायजर्स हैदराबाद यांच्याविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब (KXIP) ला आणखी एका पराभवाचा धक्का लागला. या सामन्यात पंजाबच्या बॅट्समननी हैदराबादच्या बॉलरसमोर अक्षरशः नांगी टाकली. निकोलस पुरनने एक बाजू सांभाळत विजयासाठी प्रयत्न केले, पण इतर बॅट्समननी त्याला साथ न दिल्याने अखेर पंजाबला 69 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत पंजाबला मोठी रक्कम मोजून घेतलेल्या ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) कडून  मोठी अपेक्षा होती. पण मॅक्सवेलचा फ्लॉप शो सुरूच आहे, त्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. ग्लेन मॅक्सवेलचे बरेच मिम्स सध्या व्हायरल झाले आहेत.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने 12 बॉलमध्ये 7 रन केल्या. त्यामुळे पंजाबला गरज असताना मॅक्सवेल महत्त्वाची भूमिका पार पडायला कमी पडला. या सामन्यात निकोलस पुरनने धमाकेदार खेळी करत 37 बॉलमध्ये 77 रन केल्या. पण मॅक्सवेल रनआऊट झाल्याने पंजाबचं आव्हान आणखी कठीण झालं. सलग 6 सामन्यात फ्लॉप गेल्यानं मॅक्सवेलवर सोशल मीडियावर अनेक मिम्स तयार करण्यात आले आहेत. यातून पंजाबच्या टीमवर देखील टीका करण्यात येत आहे, तसंच मॅक्सवेलची टीममधून हकालपट्टी करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

या पराभवाबरोबरच पॉईंट्स टेबलमध्ये पंजाबची टीम तळाला जाऊन पोहोचली आहे. या सगळ्यात त्यांच्यासाठी एकच समाधानाची बाब आहे ती म्हणजे ऑरेंज कॅप. पंजाबचा कर्णधार केएल राहुल याच्याकडे ही कॅप असून त्याने आतापर्यंत 313 रन केल्या आहेत. दरम्यान, या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना हैदराबादने कर्णधार वॉर्नर आणि बेअरस्टो यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 201 रन केल्या होत्या. यामध्ये बेअरस्टो याने 97 रनची खेळी केली होती. त्यानंतर राशिद खानने 12 रन देत पंजाबच्या 3 बॅट्समनना माघारी धाडलं आणि हैदराबादला शानदार 69 रननी विजय मिळवून दिला.

First published: