मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : नवे आहेत पण छावे आहेत! यंदा दिग्गजांवर भारी पडले ‘हे’ 6 युवा खेळाडू

IPL 2020 : नवे आहेत पण छावे आहेत! यंदा दिग्गजांवर भारी पडले ‘हे’ 6 युवा खेळाडू

पदार्पण ते प्रसिद्धी! हे युवा खेळाडू यंदाच्या हंगामात रोहित, विराट आणि धोनीवरही पडले भारी.

पदार्पण ते प्रसिद्धी! हे युवा खेळाडू यंदाच्या हंगामात रोहित, विराट आणि धोनीवरही पडले भारी.

पदार्पण ते प्रसिद्धी! हे युवा खेळाडू यंदाच्या हंगामात रोहित, विराट आणि धोनीवरही पडले भारी.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : दरवर्षीप्रमाणेच यावर्षीच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतूनही काही दर्जेदार युवा खेळाडू आपल्या जबरदस्त कामगिरी करत आहेत. हेच युवा भारतीय खेळाडू येत्या काही वर्षात भारताचे प्रतिनिधित्व करतील. आयपीएल स्पर्धेतून भारतालाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अशा नवोदित सक्षम खेळाडूंची ओळख होत असते.

संयुक्त अरब अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल टी -20 स्पर्धेत रवी बिष्णोई, ईशान किशन, राहुल तेवतिया, देवदत्त पड्डीकल, टी. नटराजन, कार्तिक त्यागी या खेळाडूंनी आपल्या खेळातून त्याचबरोबर बड्या-बड्या खेळाडूंसोबत खेळतानाही खेळाचा ताण सहन करण्याच्या क्षमतेचं प्रदर्शन करून क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रवी बिष्णोई

या वर्षाच्या सुरुवातीला अंडर 19 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक 17 विकेट घेणारा लेग स्पिनर रवी बिष्णोई याच्यासाठी त्याच्या मनासारखं आयपीएल पदार्पण झालं आहे. आतापर्यंत त्यानी 10 सान्यांत नऊ विकेट घेतल्या आहेत आणि तो किंग्ज इलेव्हन पंजाबचा एक आघाडीचा गोलंदाज आहे. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टोव्ह, रिषभ पंत, अरॉन फिंच, इऑन मॉर्गन या दिग्गजांना रवीनं माघारी धाडलं आहे. पंजाबचे प्रमुख प्रशिक्षक आणि ज्येष्ठ लेग स्पिनर अनिल कुंबळेंसारखीच गोलंदाजी टाकण्याची पद्द्धत असलेल्या रवीने फ्लिपर्स, टॉप-स्पिनर्स आणि गूगली चेंडू टाकून फलंदाजांवर वचक ठेवला आहे.

ईशान किशन

गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघालाही एक उगवता स्टार फलंदाज सापडला आहे तो म्हणजे ईशान किशन. ईशाननं बॅंगलोरविरुद्ध जबरदस्त 99 धावांची खेळी केली होती. ईशाननं 6 सामन्यांत 193 धावा करून सर्वांना चकित केलं आहे. त्याची फलंदाजीची सरासरी 140 असून ही कामगिरी त्याच्यातल्या कौशल्याची चुणूक दाखवत आहे.

देवदत्त पड्डीकल

यावर्षी आयपीएलमध्ये लोकांच्या नजरा आकर्षित करून घेणारा आणखी एक नवोदित चर्चेत आहे तो म्हणजे देवदत्त पड्डीकल. यंदा पदार्पण करणाऱ्या 20 वर्षांच्या देवदत्तनं रॉयल चॅलेंजर्समधील विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, अरॉन फिंच यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीतही स्वतः ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कर्नाटकच्या या डावखुऱ्या फलंदाजानी 10 सामन्यांत 321 धावा केल्या आहेत. देवदत्तने आपल्या योगदानाने रॉयल चॅलेंजर्सच्या यशात भर घातली असून सध्या हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.

राहुल तेवतिया

राजस्थान रॉयल्ससाठी राहुल तेवतिया म्हणजे जबरदस्त सेन्सेशन ठरला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात शेल्डन कॉटरेलला 5 षटकार ठोकत 53 धावांच्या बळावर राजस्थानला विजय मिळवून दिल्यानंतर राहुलबद्दल क्रिकेट विश्वात जबदस्त चर्चा झाली आणि अजूनही चालू आहे. त्या एका सामन्यानी त्याला एका रात्रीत स्टार बनवलं. त्यानी 10 सामन्यांत 222 धावा केल्या असून त्यानी गोलंदाजीतही बड्याबड्या खेळाडूंना बाद करत आपल्या नावावर 7 विकेट्स नोंदवल्या आहेत.

टी नटराजन

सनरायझर्स हैदराबादलाही डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजनच्या रूपात एक चमकता सितारा गवसला आहे. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत तमिळनाडूच्या 29 वर्षांच्या या वेगवान गोलंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. त्याने 9 सामन्यातं 8.46 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या आहेत. सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला जेव्हा समोरच्या संघाची विकेट घ्यायची असते तेव्हा तो विश्वासाने नटराजनच्या हातात चेंडू देतो.

कार्तिक त्यागी

जुन्या खेळाडूंच्या तुलनेत आयपीएल लिलावात चांगली किंमत मिळवणारा आणखी एक खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी. अंडर 19 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत त्यागीने 11 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानी आपला वेग आणि बॉल टाकण्याची शैली यानी इयान बिशप यांना चकित केलं होतं. राजस्थान रॉयल्स संघाकडून आतापर्यंत त्याने सहा सामन्यांत 6 बळी घेतले असले तरीही त्याने गोलंदाजीतून आपल्या कौशल्याची चमक दाखवली. वेगवान गोलंदाज आणि लिजंड ब्रेट ली याच्यासारखी त्यागीची पदद्धत असल्याचं बोललं जातं पण मन शांत ठेऊन विराट कोहली किंवा डिव्हिलिअर्ससारख्या दिग्गजांसमोर सर्वोत्तम लाइन आणि लेंग्थचा चेंडू टाकण्याच्या त्याचा क्षमेतमुळे अनेक माजी खेळाडूंना त्याच्याकडून उज्ज्वल कामगिरीच्या अपेक्षा आहेत.

First published:

Tags: Mumbai Indians, RCB