Home /News /sport /

IPL Final MI vs DC : फायनलसाठी मैदानात उतरताच श्रेयस मोडणार रोहित शर्माचा 7 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

IPL Final MI vs DC : फायनलसाठी मैदानात उतरताच श्रेयस मोडणार रोहित शर्माचा 7 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Delhi Capitals vs Mumbai Indians) सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

    दुबई, 10 नोव्हेंबर : 56 लीग मॅच आणि तीन प्लेऑफ सामन्यानंतर आज अखेर आयपीएल-2020चा (IPL 2020) अंतिम सामना होणार आहे. आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Delhi Capitals vs Mumbai Indians) सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. एकीकडे चारवेळा चॅम्पियन असलेला मुंबईचा संघ तर दुसरीकडे पहिल्यांदाच आयपीएल फायनल (IPL final 2020) गाठणारा दिल्लीचा संघ. त्यामुळे युवा खेळाडू अनुभवी खेळाडूंना मात देण्याच्या प्रयत्नात असतील. त्याआधी जाणून घेऊन या महामुकाबल्यातील 6 महत्त्वाच्या गोष्टी. - हा सामना आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि युवा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने 4 वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. -केवळ 3 वेळा लीग स्टेजमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला संघ आयपीएल जिंकू शकला आहे. यात दोन वेळा मुंबई इंडियन्स तर एकदा राजस्थान रॉयल्सनं बाजी मारली आहे. मुंबई यावेळी लीग स्टेजमध्ये टॉपवर होती. - दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएल फायनलमध्ये संघाचे नेतृत्व करणारा सर्वात युवा कर्णधार असेल. श्रेयस अय्यर आज रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडेल. -2013मध्ये रोहित शर्मा आणि 2020मध्ये श्रेयस अय्यर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार न होताच आयपीएल खेळणारे भारतीय खेळाडू आहेत. रोहितनं 2013मध्ये आणि श्रेयसनं 2020 एकदिवसीय आणि टी-20मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. -दिल्ली कॅपिटल्स संघात तीन भारतीय खेळाडू असे आहेत जे याआधी आयपीएल जिंकलेल्या संघांत होते. शिखर धवन 2016मध्ये सनरायजर्स हैदराबाद, आर अश्विन 2010 आणि 2011 चेन्‍नई सुपर किंग्‍स आणि अक्षर पटेल 2013मध्ये आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघात होता.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: IPL 2020, Mumbai Indians, Rohit sharma, Shreyas iyer

    पुढील बातम्या