दुबई, 10 नोव्हेंबर : चारवेळा आयपीएल (IPL 2020) चॅम्पियन झालेला मुंबई इंडियन्सचा संघ (Mumbai Indians) यावर्षी पुन्हा एकदा आयपीएलचा किताब जिंकण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे मुंबईचा सामना पहिल्यांदा आयपीएल फायनल गाठलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. मात्र या सामन्यात दिल्ली विरुद्ध मुंबई अशी लढत नाही तर मुंबई विरुद्ध मुंबई अशी लढत पाहायला मिळणार आहे.
हा सामना आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि युवा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यात होणार आहे. मुळात दोन्ही खेळाडू मुंबईचे आहे. रोहित आणि श्रेयस दोघंही मुंबईकडून रणजी खेळले आहेत. त्यामुळे मुंबईच्या दोन खेळाडूंमध्ये ही लढत असेल. एवढेच नाही तर दोन्ही संघात मिळून एकूण 7 मुंबईकर खेळाडू आहे. या सामन्यात रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे,धवल कुलकर्णी, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, तुषार देशपांडे हे 7 खेळाडू खेळताना दिसू शकतात.
मुंबईच्या टीमने आतापर्यंत शानदार कामगिरी केली असली तरी, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मात्र संपूर्ण स्पर्धा संपत आली तरीही फॉर्म गवसलेला नाही.या आयपीएलमध्ये रोहित शर्माने दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्याने कोलकात्याविरुद्ध 54 बॉलमध्ये 80 रन, तर पंजाबविरुद्ध 45 बॉलमध्ये 70 रन केल्या होत्या. या दोन्ही खेळी त्याच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये आल्या होत्या. त्यानंतर एकही सामन्यात रोहितला मोठी खेळी करता आलेली नाही.
वाचा-मैदानात उतरताच श्रेयस मोडणार रोहित शर्माचा 7 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड
तर दुसरीकडे श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मात्र पृथ्वी शॉला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. शॉला याआधी SRHविरुद्ध झालेल्या क्वालिफायर-2 सामन्यातही पृथ्वीला वगळण्यात आलं होतं. तर क्वालिफायर-1 सामन्यात मुंबईविरुद्ध पृथ्वी शून्यावर बाद झाला होता. अजिंक्य रहाणेनं RCBविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती, मात्र मुंबईविरुद्ध रहाणेही शून्यावर बाद झाला होता. तर, कल्याणचा तुषार देशपांडेला गेले काही सामना संघात जागा मिळाली नाही आहे. तर, मुंबईकर धवल कुलकर्णीनं या हंगामात केवळ एक सामना खेळला आहे.
वाचा-IPL 2020 : दिल्लीने फायनलसाठी घेतला सर्वाधिक वेळ, पाहा सगळ्या टीमचं रेकॉर्ड
असा असेल मुंबई इंडियन्सचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, केरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, नाथन कूल्टर-नाइल, क्विंटन डीकॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.
असा असेल दिल्ली कॅपिटल्सचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), कगिसो रबाडा, मार्कस स्टोयनिस, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शेमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, ऋषभ पंत, एनरिच नॉर्खिया, डॅनिअल सॅम्स.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.