Home /News /sport /

IPL 2020 Final: 11 नाही दिल्ली कॅपिटल्सचे फक्त 'या' 5 खेळाडूंचं फायनलमध्ये मुंबईला असणार आव्हान!

IPL 2020 Final: 11 नाही दिल्ली कॅपिटल्सचे फक्त 'या' 5 खेळाडूंचं फायनलमध्ये मुंबईला असणार आव्हान!

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात दिल्ली (Delhi Capitals)ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीचा 13 रनने विजय झाला.

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात दिल्ली (Delhi Capitals)ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीचा 13 रनने विजय झाला.

दिल्ली कॅपिटल्सचे हे 5 खेळाडू मुंबई इंडियन्सला देणार कडवे आव्हान, संघाला जिंकून देऊ शकतात IPL ट्रॉफी.

    मुंबई, 10 नोव्हेंबर : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ पहिल्यांदाच आयपीएल फायनलमध्ये पोहचला आहे. रविवारी झालेल्या क्वालिफायर-2मध्ये दिल्लीनं हैदरबादाचा (SRH) 17 धावांनी पराभव केला. आता फायनलमध्ये त्यांची लढत मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) होणार आहे.10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे. चार वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबईला हरवणं दिल्लीसाठी सोपं नसणार आहे. मात्र दिल्ली कॅपिटल्सचे हे 5 खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असतील तर ते नक्कीच मुंबई इंडियन्सला पराभूत करतील. शिखर धवनची आक्रमक खेळी दिल्लीसाठी या हंगामात त्यांच्या सलामीच्या जोड़ीनं विशेष चांगली कामगिरी केली नाही आहे. मात्र शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये आहे. हैदराबादविरुद्ध शिखर धवननं 78 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यंदा आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मुंबईविरुद्ध फायनलमध्ये धवनकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल. IPL 2020 : आयपीएल फायनलआधी मुंबईला या गोष्टीची चिंता मार्कस स्टॉयनिसची अष्टपैलू खेळी मुंबईकडे कृणाल, हार्दिक आणि पोलार्ड असतील तर दिल्लीकडे यांना टक्कर देणारा एकच मार्कस स्टॉजनिस आहे. हैदराबादविरुद्ध मार्कस सलामीला आला आणि त्यानं 27 चेंडूत 38 धावांची खेळी केली. एवढेच नाही तर गोलंदाजीमध्येही त्यानं 3 विकेट घेतल्या. वाचा-MI vs DC सोडा, फायनलमध्ये 'या' दोन गोलंदाजांमध्ये होणार खरा मुकाबला कगिसो रबाडा गोलंदाजीमध्ये दिल्लीचा हुकुमी एक्का म्हणजे कगिसो रबाडा. रबाडानं या हंगामात 29 विकेट घेतल्या आहेत. सध्या त्याच्या नावावर पर्पल कॅप आहे. रबाला प्रत्येत 13व्या चेंडूवर विकेट घेतो. हैदराबादविरुद्ध सामन्यात त्यानं एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. तर मुंबईविरुद्ध क्वालिफायर-1 सामन्यात त्यानं सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना बाद केलं होतं. वाचा-IPL 2020 : फायनलमध्ये दोन मुंबईकर भिडणार! पाहा मुंबईचं रेकॉर्ड भारी का दिल्लीचं शिमरॉन हेटमायर दिल्लीकडून शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमक करणारा फलंदाज म्हणजे हेटमायर. हेटमायर कोणत्याही क्रमांकाला फलंदाज करू शकतो. हैदराबाद विरुद्ध त्यानं 22 चेंडूत महत्त्वपूर्म अशी 42 धावांची खेळी केली होती.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: IPL 2020, Mumbai Indians

    पुढील बातम्या