Home /News /sport /

MI vs DC सोडा, फायनलमध्ये 'या' दोन गोलंदाजांमध्ये होणार खरा मुकाबला; कोण मारणार बाजी?

MI vs DC सोडा, फायनलमध्ये 'या' दोन गोलंदाजांमध्ये होणार खरा मुकाबला; कोण मारणार बाजी?

IPL फायनलला 'या' दोन गोलंदाजांमध्ये होणार खरी लढत, कोण मिळवणार पर्पल कॅप?

    अबु धाबी, 09 नोव्हेंबर : आयपीएल-2020 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. 10 नोव्हेंबररोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात लढत होणार आहे. रविवारी झालेल्या क्वालिफायर-2मध्ये दिल्लीनं सनरायजर्सना हरवले. तर, अंतिम सामन्याबरोबर पर्पल कॅपची (Purple Cap) शर्यतही अटीतटीची झाली आहे. दिल्लीच्या कागिसो रबाडानं (Kagiso Rabada) मुंबईच्या जसप्रीत बुमराहकडून पर्पल कॅप हिसकावली आहे. रबाडाच्या नावावर आता 29 विकेट आहेत. खास गोष्ट म्हणजे या हंगामात सर्वात जास्त विकेट घेणारे तीन गोलंदाज फायनल खेळणार आहेत. हैदराबादविरुद्ध झालेल्या क्वालिफायर-2 सामन्यात रबाडानं एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. याआधी त्याच्या नावावर 25 विकेट होत्या. मात्र या सामन्यात 4 विकेट घेत रबाडानं बुमराहला मागे टाकलं आहे. बुमराह सध्या 27 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाचा-1 6 W W Wd W 0! सहा चेंडूंनी बदललं श्रेयस अय्यरचं नशीब, पाहा VIDEO फायनलमध्ये कळणार कोण मारणार बाजी फायनलमध्ये हे दोन्ही फलंदाज खेळणार आहेत. त्यामुळे केवळ फायनल सामना दोन संघांमध्येच नाही तर दोन गोलंदाजांमध्येही होणार आहे. या रेसमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मुंबईचा आणखी एक गोलंदाज आहे. ट्रेंट बोल्टनं या हंगामात 22 विकेट घेतल्या आहेत. बुमराह एका हंगामात सर्वात जास्त विकेट घेणारा भारतीय गोलंदाज झाला आहे. याआधी हैदराबादकडून भुवनेश्वरनं 26 विकेट घेतल्या होत्या. वाचा-IPL 2020 : फायनलमध्ये दोन मुंबईकर भिडणार! पाहा मुंबईचं रेकॉर्ड भारी का दिल्लीचं यावर्षी तुटणार सर्वात जास्त विकेटचा रेकॉर्ड? आयपीएलच्या या हंगामात सर्वात जास्त विकेटचा रेकॉर्डही तुटू शकतो. हा रेकॉर्ड सध्या चेन्नईचा गोलंदाज ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. ब्राव्होनं 2013मध्ये 32 विकेट घेतल्या होत्या. तर, दुसऱ्या क्रमांकावर 29 विकेटसह रबाडा आहे. त्यामुळे या हंगामात सर्वात जास्त रेकॉर्ड घेण्याचा विक्रम मोडू शकतो.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: IPL 2020

    पुढील बातम्या