स्पोर्ट्स

  • associate partner

IPL इतिहासातले 'हे' 3 ओव्हर ठरले सर्वात महागडे! फलंदाजांनी गोलंदाजांना धू-धू धुतलं, पाहा VIDEO

IPL इतिहासातले 'हे' 3 ओव्हर ठरले सर्वात महागडे! फलंदाजांनी गोलंदाजांना धू-धू धुतलं, पाहा VIDEO

बापरे! या तीन ओव्हरमध्ये फलंदाजांनी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. तुम्ही या मॅच मिस केल्या असतील तर पाहा VIDEO.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : आयपीएलचा (IPL 2020) तेरावा हंगाम 19 सप्टेंबरपासून दुबईमध्ये होत आहे. कोरोनाव्हायरसमुळे आयपीएलचा हंगाम भारतात नाही तर युएइमध्ये होणार आहे. दुबई, अबुधाबी आणि शारजाहमध्ये आयपीएलचे सामने होणार असून 19 सप्टेंबरला पहिला सामना खेळवला जाणार आहे तर, 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होईल. या स्पर्धेत एकूण 10 डबल हेडर्स सामने असणार आहे.

आयपीएलच्या गेल्या 12 हंगामात फलंदाजांनी एका पेक्षा एक तुफान फलंदाजी केली. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात अनेक रेकॉर्ड ब्रेक खेळी झाल्या, मात्र आयपीएलमध्ये या तीन ओव्हर सर्वात महागड्या ठरल्या जातात.

3. ख्रिस गेल आणि मनोज तिवारी vs रवि बोपारा

आयपीएल 2010मध्ये ख्रिस गेल कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळायचा. या हंगामाच्या सातव्या मॅजमध्ये kkr vs kxip या सामन्यात गेलनं रवि बोपाराची धुलाई केली. गेल आणि मनोज तिवारी यांनी मिळून एका ओव्हरमध्ये 33 धावा काढल्या. या ओव्हरमध्ये गेलनं बोपाराला 4 षटकार मारले. याशिवाय बोपारानं एक चेंडू व्हाइड टाकला आणि एक व्हाइड चेंडू सीमारेषे पार गेला, याचे 5 रन्स मिळाले. तर, फलंदाजांनी या ओव्हरमध्ये 3 सिंगल्सही घेतल्या.

वाचा-अजब विक्रम! IPL मध्ये एकदाही शून्यावर बाद नाही झाला 'हा' दिग्गज फलंदाज

2. सुरेश रैना vs परविंदर अवाना

2014मध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा संघ फायनलमध्ये पोहचू शकला नाही. क्वालिफायर-2 सामन्यात चेन्नईचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत होता. या सामन्यात पंजाबनं चेन्नई संघापुढे 226 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून सुरेश रैनानं तुफान फलंदाजी केली. परविंदर अवानाच्या एका ओव्हरमध्ये रैनानं तब्बल 33 धावा केल्या.

वाचा-IPL मधला 'हा' संघ आहे सर्वात वाईट, 6 संघाकडून खेळलेल्या युवीनं केला खुलासा

डावाच्या सहाव्या ओव्हरला अवाना गोलंदाजी करण्यासाठी आला. रैनानं या ओव्हरमध्ये 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर एक रन नो बॉलचाही मिळाला. मात्र रैनाची आक्रमक खेळी चेन्नईला हा सामना जिंकून देऊ शकली नाही. चेन्नईनं हा सामना 24 धावांनी गमावला.

वाचा-'हे' 5 फलंदाज आहेत IPL चे किंग! नावावर सर्वात जलद अर्धशतक लगावण्याचा विक्रम

1. ख्रिस गेल vs प्रशांत परमेश्वरन

2011च्या आयपीएल हंगामात कोची टस्कर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात गेलनं तुफान फलंदाजी केली होती. पहिले फलंदाजी करत कोची संघानं बंगळुरू संघासमोर केवळ 126 धावांचे आव्हान ठेवले होते. हा सामना लवकर संपवण्याच्या उद्देशानं गेल पहिल्या चेंडूपासून तुफान फटकेबाजी करू लागला.

वाचा-IPL 2020 आधी गेलवर कोरोनाचे संकट, 'त्या' पार्टीमुळे करावी लागली कोरोना चाचणी

सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रशांत परमेश्वरनची गेलनं धुलाई केली. एकाच ओव्हरमध्ये गेलनं 37 धावा केल्या. यात 4 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. एक धावा नो बॉलचाही मिळाला. ही ओव्हर आयपीएलच्या इतिहासतली सर्वात महागडी ओव्हर मानली जाते.

Published by: Priyanka Gawde
First published: August 28, 2020, 1:12 PM IST

ताज्या बातम्या