अबु धाबी, 07 नोव्हेंबर : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाचे (RCB) पुन्हा एकदा आयपीएल (IPL 2020) जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. विराटच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये केवळ 131 धावा केल्या, सनरायजर्स हैदराबाद संघानं हा सामना 6 विकेटनं जिंकला. RCBच्या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) विराट कोहलीच्या कर्णधारपदावर आणि संघावर टीका केली. गंभीर म्हणाला की, हा संघ प्लेऑफ पोहचण्यासाठीही लायक नव्हता, RCBनं विराट सोडून दुसऱ्या खेळाडूकडे कर्णधारपद द्यावे.
गंभीरनं केली कर्णधार बदलण्याची मागणी
RCBच्या पराभवानंतर गंभीरनं इएसपीएन क्रिकइन्फोशी संवाद साधताना, RCBला आपला कर्णधार बदलण्याची वेळ आली आहे. गंभीरनं सांगितले की, " 8 वर्ष कप न जिंकणे हा मोठा कालावधी आहे. ही जबाबदारीची बाब आहे. त्यामुळे कोहलीनं जबाबदारी ओळखून कर्णधारपद सोडावं". मुख्य म्हणजे या महत्त्वाच्या सामन्यात विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी आला मात्र 6 धावा करत बाद झाला.
वाचा-IPL 2020 : विराटचं स्वप्न पुन्हा भंगलं, एलिमिनेटरमध्ये हैदराबादचा बँगलोरवर विजय
पराभवाला जबाबदार कोण?
गंभीरनं विराट कोहलीने नाव न घेता संघातील नेतृत्वावर टीका केली. गंभीर म्हणाला की, जोपर्यंत पराभवासाठी नेतृत्वाला जबाबदार धरले जात नाही, तोपर्यंत असेच होत राहणार. मी सपोर्ट स्टाफ, बॅटिंग कोट सगळ्यांसाठी दु:खी आहे. प्रत्येकवर्षी कोच बदलतो, मात्र संघाची परिस्थिती तशीच आहे".
वाचा-IPL 2020 : ऋषभ पंतला समजव, चाहत्यांचं बहिणीला आवाहन
हैदराबादचा सामना दिल्लीशी
बँगलोरविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आता हैदराबादचा सामना दिल्लीशी होणार आहे. रविवारी या दोन्ही टीममध्ये क्वालिफायरची दुसरी मॅच होईल. या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल, ती मंगळवारी मुंबईविरुद्ध आयपीएलची फायनल खेळेल.