स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 DC vs KXIP LIVE: सुपर ओव्हरमध्ये दिल्लीनं जिंकला सामना, मयंक अग्रवालची खेळी व्यर्थ

IPL 2020 DC vs KXIP LIVE: सुपर ओव्हरमध्ये दिल्लीनं जिंकला सामना, मयंक अग्रवालची खेळी व्यर्थ

दिल्ली आणि पंजाब यांच्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये सामना 10 विकेटनं जिंकला.

  • Share this:

दुबई, 20 सप्टेंबर : दिल्ली आणि पंजाब यांच्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये सामना 10 विकेटनं जिंकला. दिल्लीने दिलेल्या 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मयंक अग्रवालनं 89 धावांची खेळी केली. मात्र 3 चेंडूत 1 धावांची गरज असताना सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीकडून रबाडानं गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. केएल राहुल आणि निकोलस पूरन फलंदाजीला आले. पहिल्या चेंडूवर केएल राहुलनं 2 धावा काढल्या. मात्र दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुल बाद झाला आणि तिसऱ्या चेंडूवर पूरनला रबाडानं बोल्ड केले. त्यामुळे केवळ सुपर ओव्हरमध्ये दिल्लीला 3 धावांचे आव्हान.

पंजाबकडून मोहम्मद शमीनं गोलंदाजी केली. फलंदाजीसाठी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर होता. शमीनं पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर दुसरा चेंडू व्हाइड टाकला. त्यानंतर दिल्लीला विजयासाठी दोन धावांची गरज असताना, दुसऱ्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सनं सामना जिंकला.

त्याआधी मयंक अग्रवालनं जबरदस्त फलंदाजी केली. मोहित शर्मानं केएल राहुलला 21 धावांवर बाद केले. त्यानंतर आर अश्विनने एकाच ओव्हरमध्ये करून नायर आणि निकोलस पूरन यांना माघारी धाडलं. तर भरवशाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेलही केवळ 1 धाव करत बाद झाला. दिल्लीकडून रबाडा आणि अश्विननं 2 तर अक्स पटेल आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.

पहिल्या डावात दिल्लीनं शेवटच्या 20 ओव्हरमध्ये 157 धावा करत पंजाबला 158 धावांचे आव्हान दिले. मात्र एक वेळ अशी होती, जेव्हा दिल्लीला 130चा टप्पा पार करणंही कठिण होतं. मात्र जॉर्डनच्या 20व्या ओव्हरनं मॅचच रुप बदललं.

आघाडीचे सर्व फलंदाज अयशस्वी झाल्यानंतर मार्कस स्टायनसनं दिल्लीचा डाव सावरला. जॉर्डनच्या 20 ओव्हरमध्ये स्टायनसननं तब्बल 30 धावा काढल्या. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू व्हाइड झाला. त्यानंतर सलग 3 चौकार मारत आणखी एक षटकार लगावला. अखेरचा चेंडूही जॉर्डननं नो बॉल टाकला, त्यामुळे आणखी एक अतिरिक्त धाव दिल्लीला मिळाली. यासह स्टायनसनं 20 चेंडूत 52 धावा केल्या. जॉर्डननं 4 ओव्हरमध्ये 14.0च्या सरासरीनं 56 धावा दिल्या.

दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टाइनस, अक्सर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, अॅनरिच नोर्जे, मोहित शर्मा.

किंग्स इलेव्हन पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार/विकेटकीपर), मयंक अग्रवाल, करून नायर, सर्फराज खान, ग्लेनमॅक्सेवल, निकोलस पूरन, क्रष्णप्पा गोतम, ख्रिस जोर्डन, शेल्डन कॉटरेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी.

Published by: Priyanka Gawde
First published: September 20, 2020, 7:03 PM IST

ताज्या बातम्या