IPL 2020 : रोहितच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्स कसे जिंकणार IPL? संघापुढे 'ही' 5 मोठी आव्हानं

IPL 2020 : रोहितच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्स कसे जिंकणार IPL? संघापुढे 'ही' 5 मोठी आव्हानं

रोहित न खेळल्यास मुंबई इंडियन्सचा IPL जिंकण्याचा प्रवास खडतर होऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : आयपीएल 2020 (IPL 2020) ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी खेळत आहेत. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गतविजेत्या मुंबईने 11 सामन्यात 14 गुण मिळवले आहे. त्यामुळे प्लेऑफ गाठण्यासाठी त्यांना एक सामना जिंकावा लागणार आहे. याआधीच मुंबईला एक मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

रोहितच्या हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत झाल्यामुळे तो गेले दोन सामने खेळू शकला नव्हता. एवढेच नाही तर, दुखापतीमुळे बीसीसीआयनं रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही वगळले आहे. टीम इंडियाचे फिजिओ नितिन पटेल यांनी रोहितच्या दुखापतीबाबत दोन विशेष डॉक्टरांशी चर्चा केली आहे. त्यानुसार रोहितला दोन-तीन आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे रोहित आयपीएल खेळणार नसल्याचे जवळजवळ निश्चित आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही आहे.

वाचा-रोहित शर्मा IPL खेळणार की नाही? अखेर हिटमॅनचा मेडिकल रिपोर्ट आला समोर

रोहित शर्माला काय झालं?

18 ऑक्टोबर रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मा खेळू शकला नव्हता. 23 ऑक्टोबर रोजी चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहितला हॅमस्ट्रिंग झाल्याचे सांगण्यात आले. सध्या मुंबई इंडियन्सची जबाबदारी पोलार्डकडे आहे.

वाचा-रोहित शर्माच्या दुखापतीबाबत आली मोठी अपडेट! हिटमॅन IPL खेळणार की नाही?

मुंबईचा प्रवास होणार खडतर

1. रोहित शर्माच्या अनुपस्थित सध्या संघाचे कर्णधारपद कॅरन पोलार्डकडे देण्यात आले आहे. मात्र पोलार्डला रोहित एवढा अनुभव नाही आहे. पोलार्डनं आतापर्यंत रोहितच्या अनुपस्थितीतच कर्णधार भुषवले आहे. यात गेल्या सामन्यात मुंबईला राजस्थानकडून पराभवाचा फटका बसला.

2. रोहित शर्मा सलामीवीर म्हणून केवळ आयपीएलमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रसिद्ध आहे. रोहितच्या जागी सध्या सलामीला इशान किशान येत आहे. या दोघांनी चेन्नईविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. मात्र इशान किशान युवा खेळाडू असल्यामुळे तो कितपत चांगली कामगिरी करेल याबाबत शंका आहेत.

3. रोहितच्या जागी संघात सौरभ तिवारीला जागा देण्यात आली आहे. सौरभवला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. त्यामुळे रोहितची अनुपस्थिती मुंबईसाठी नक्कीच चिंतेची बाब असणार आहे.

4. मुंबई इंडियन्समध्ये युवा खेळाडूंपेक्षा जास्त अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे रोहितचा अनुभव संघासाठी मोलाचा आहे. रोहित शर्माच्या अनुभवामुळे संघांने अनेकदा सामने जिंकले आहे.

5. मुख्य गोष्ट म्हणजे रोहित शर्मा बाहेर पडल्यास संघाचा एक चांगला फलंदाज कमी होईल. सध्या आयपीएलमध्ये खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रोहित शर्मानं माघार घेतल्यास कोणता फलंदाज त्याला रिप्लेस करणार हे सुद्ध पाहावे लागेल.

Published by: Priyanka Gawde
First published: October 28, 2020, 3:03 PM IST

ताज्या बातम्या