IPL 2020 : दिल्लीच्या नेतृत्वासाठी दोन मुंबईकरांमध्ये जुंपली, कोण मारणार बाजी?

IPL 2020 : दिल्लीच्या नेतृत्वासाठी दोन मुंबईकरांमध्ये जुंपली, कोण मारणार बाजी?

पद एक पण दावेदार तीन! कोणाकडे असणार दिल्लीचे नेतृत्व?

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : जगातली सर्वात मोठी लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. त्यामुळं आयपीएलचा पुढचा हंगाम सुरू होण्याआधीच कोण बाजी मारणार यासाठी तर्क वितर्क लढवले जातात. आता 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव होणार आहे. त्याआधी आठही संघांनी खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आयपीएलच्या संघांमध्ये खेळाडूंची अदलाबदल झाली आहे.

ट्रेड विंडो बंद झाल्यानंतर आठ संघातील खेळाडूंमध्ये बदल झाला आहेत. त्यामुळं आता उरलेल्या खेळाडूंचा निकाल हा लिलावा दरम्यान लागू शकतो. दरम्यान दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण या संघात एकाच पदासाठी तीन दावेदार आहेत. त्यामुळं दिल्लीचे नेतृत्व कोणाकडे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्य म्हणजे यात दिल्लीच्या नेतृत्वासाठी दोन मुंबईकरांमध्ये जुंपली आहे.

वाचा-युवी तू काय केलंस! 'त्या' एका चुकीमुळे IPLमध्ये सिक्सर किंगला मुकणार चाहते

गेल्या हंगामात शानदार कामगिरी करत प्ले ऑफमध्ये स्थान मिळालेल्या दिल्ली कॅपिटल्स संघ आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी सज्ज आहे. याआधी दिल्ली डेअरडेव्हिल्स असलेल्या संघाला नेहमीच दिल्लीकर कर्णधार लाभले आहेत. मात्र गेल्या हंगामात दिल्ली संघाचे नेतृत्व मुंबईकर श्रेयस अय्यरनं केले. युवा नेतृत्वाचा फायदा संघाला झाला, आणि प्ले ऑफपर्यंत या संघाने मजल मारली. आता मात्र या संघात काही बदल करण्यात आले आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली संघानं राजस्थान रॉयल्स अजिंक्य रहाणे आणि किंग्ज इलेव्हन संघाचा कर्णधार आर. अश्विन यांना ट्रेड विंडोमध्ये संघात जागा दिली. अजिंक्य रहाणे तब्बल 9 वर्ष राजस्थान संघात होता. यात त्यानं दोन वर्ष संघाचे नेतृत्वही केले. तर, दुसरीकडे आर. अश्विनच्या नेतृत्वाखाली एकदा प्लेऑफमध्ये पंजाब संघानं प्रवेश केला. मात्र गेल्या हंगामात दोन्ही संघांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं दिल्लीचा संघ कोणाला संधी देणार हे पाहावे लागणार आहे.

वाचा-धोनीला रिलीज करणार का? सूत्रांच्या माहितीवर CSK ने दिलं ऑफिशिअल उत्तर

श्रेयस अय्यरनं व्यक्त केला आनंद

अश्विन आणि रहाणे यांना दिल्ली संघात घेतल्याबद्दल श्रेयसनं त्यांचे स्वागत केले आहे. दिल्ली संघानं एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये दोन सिनिअर खेळाडू संघात आल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, “अनुभवी सुपरस्टार संघात आल्यामुळं मला आनंद आहे. खेळाडूंचा लिलाव होणे बाकी आहे. त्यामुळे अशा शानदार संघाचे नेतृत्व करण्याचा एक वेगळा आनंद आहे”, असे मत कर्णधार श्रेयसनं व्यक्त केले.

वाचा-मिशन IPL 2020! रोहितसाठी धोक्याची घंटा, संघातील स्टार खेळाडू अजूनही जखमी

वाचा-IPLमध्ये एकही विजेतेपद न मिळालेल्या विराटला रोहित, धोनीपेक्षा मिळतो जास्त पगार

दिल्ली कॅपिटल्सने 5 खेळाडूंना केले रिलीज

क्रिस मॉरिस, कोलिन इनग्राम, हनुमा विहारी, कोलिन मुनरो, अंकुश बॅंस.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2019 07:14 AM IST

ताज्या बातम्या