Home /News /sport /

IPL 2020 RCB vs DC: RCBमध्ये कुठून आला ड्युप्लेसिस? या जबरदस्त कॅचचा VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

IPL 2020 RCB vs DC: RCBमध्ये कुठून आला ड्युप्लेसिस? या जबरदस्त कॅचचा VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना फाफ ड्युप्लेसिसची आठवण आली, कारण ड्युप्लेसिसनं आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात असाच कॅच घेतला होता.

    दुबई, 06 ऑक्टोबर : आयपीएलमध्ये (IPL 2020) बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात कागिसो रबाडानं (kagiso Rabada) विराटसेनेला फलंदाजीची संधीही दिली नाही. रबाडाच्या 4 विकेटसह दिल्लीनं हा सामना 59 धावांनी जिंकला. यासह आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. रबाडानं 4 ओव्हरमध्ये 24 धावा देत 4 विकेट घेतल्या. या सामन्यात बंगळुरूनं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या फलंदाजांनी बंगळुरूच्या गोलंदाजांवर जणु आक्रमण केले. दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी 68 धावांची भागीदारी केली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र याचे श्रेय जाते ते बंगळुरूचा युवा फलंदाज देवदत्त पडक्कीलला (Devdutt Padikkal). देवदत्तनं सीमारेषेवर हवेत उडी मारून श्रेयस अय्यरची कॅच घेतली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना फाफ ड्युप्लेसिसची आठवण आली, कारण ड्युप्लेसिसनं आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात असाच कॅच घेतला होता. वाचा-फिंचला मैदानातच धमकी देऊन थांबला अश्विन, 'या' कारणामुळे केलं नाही आऊट! RCB यंदाच्या हंगामात क्षेत्ररक्षणात काहीशी कमी पडताना दिसत आहे. चांगले फिल्डर कॅच सोडत असताना देवदत्तनं घेतलेला कॅच पाहून कर्णधार कोहली मात्र खुश झाला. मोइन अलीच्या चेंडूवर श्रेयस अय्यर मोठा शॉट खेळण्याच्या नादात बाद झाला. पडक्कीलनं कॅच घेतला, मात्र त्याचा तोल गेल्यानं सीमारेषा त्यानं पार केली, त्याआधीच त्यानं चेंडू थ्रो केला त्यानंतर पुन्हा मैदानात येऊन कॅच घेतला. वाचा-चेन्नई विरुद्ध पंजाब सामना होता फिक्स? शेन वॉट्सनच्या ट्वीटमुळे चाहते संभ्रमात WATCH - Padikkal does a du Plessis. On the boundary ropes, kept his balance and @devdpd07 caught one right off catching book of @faf1307.https://t.co/QC7Wa0yZ8h #Dream11IPL #RCBvDC वाचा-IPL 2020 : इशान किशनच्या एका कॅचने मॅच फिरली, पाहा VIDEO दिल्लीकडून फलंदाजीमध्ये मार्कस स्टाइनिसनं 53 धावांची नाबाद खेळी केली. याच जोरावर दिल्लीनं 196 धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या 7 ओव्हरमध्ये दिल्लीनं 94 धावा काढल्या. तर बंगळुरूकडून कर्णधार विराट कोहलीच्या 43 धावांच्या खेळीशिवाय कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या