स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 DC vs KXIP: 2 युवा कर्णधारांमध्ये आज होणार टक्कर! येथे पाहा दिल्ली विरुद्ध पंजाब सामना LIVE

IPL 2020 DC vs KXIP: 2 युवा कर्णधारांमध्ये आज होणार टक्कर! येथे पाहा दिल्ली विरुद्ध पंजाब सामना LIVE

दोन्ही संघांनी एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवले नाही आहे. याशिवाय दोन्ही संघाचे कर्णधार युवा खेळाडू आहेत. श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करेल तर केएल राहुल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे.

  • Share this:

दुबई, 20 सप्टेंबर : आयपीएलच्या धमाकेदार ओपनिंग सामन्यानंतर आज दुसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Delhi Capitals vs Kings XI Punjab) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांनी एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवले नाही आहे. याशिवाय दोन्ही संघाचे कर्णधार युवा खेळाडू आहेत. श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करेल तर केएल राहुल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली संघात जबरदस्त फलंदाज आहेत. तर दुसरीकडे पंजाब संघाने संघात मोठे बदल केले आहे. हेड कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबचा संघ खेळणार आहे.

वाचा-'हे' 3 मुंबईकर खेळाडू झाले दिल्लीकर! IPL 2020चा पहिला सामना जिंकण्यास सज्ज

कुठे आणि कधी पाहता येणार सामना?

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Delhi Capitals vs Kings XI Punjab) यांच्यातील सामना दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

किती वाजता सुरू होणार सामना ?

भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. याआधी 7 वाजता टॉस होईल.

येथे पाहा सामन्याचा LIVE टेलिकास्ट

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (star sports network) वर पाहता येणार आहे.

येथे पाहू शकता ऑनलाईन

जर तुम्हाला ऑनलाइन सामना पाहायचा असल्याच तुम्ही डिज्नी हॉटस्टार अॅपवर (Disney Hotstar VIP) पाहू शकता.

वाचा-पहिल्या सामन्याआधी भलत्याच मूडमध्ये दिसला गेल, पोस्ट केला 'हॉट' VIDEO

हेड टू हेड

दिल्ली संघानं यावेळी संघात अजिंक्य रहाणे आणि आर अश्विन या अनुभवी खेळाडूंना संघात जागा दिली आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे. दिल्लीकडे पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या रुपाने सलामी फलंदाज आहेत. पंजाब संघाची मदार ही ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस गेल आणि कर्णधार केएल राहुल यांच्यावर असणार आहे. दिल्ली आणि पंजाब यांच्यात 5 सामने झाले आहेत. यातील 4 सामने पंजाबने जिंकले आहेत. तर एक सामना दिल्लीने. मात्र दोन्ही संघात झालेल्या अखेरच्या सामन्यात दिल्ली संघ पंजाबवर भारी पडला होता.

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, कगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिचाने, किमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, अॅनरिच नोर्जे, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोइनिस, ललित यादव.

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, शेल्डन कॉटरेल, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स नीशम, निकोलस पानन (विकेटकीपर), इशान पोरेल, अर्शदीप सिंग, मुरुगन अश्विन, कृष्णप्पा गौतम, हरप्रीत बरार, दीपक हुड्डा, क्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकंडे, रवि बिश्नोई, सिमरन सिंह (विकेटकीपर), जगदीश सुचित, तजिंदर सिंह, हार्डस विलजोन

Published by: Priyanka Gawde
First published: September 20, 2020, 5:01 PM IST

ताज्या बातम्या