मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

...तर दिल्ली कॅपिटल्स ठरला असता Playoff गाठणारा दुसरा संघ, वाचा कुठे चुकला श्रेयस अय्यर

...तर दिल्ली कॅपिटल्स ठरला असता Playoff गाठणारा दुसरा संघ, वाचा कुठे चुकला श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यरमुळे दिल्ली जाणार IPL बाहेर? या 6 चुका पडणार महागात.

श्रेयस अय्यरमुळे दिल्ली जाणार IPL बाहेर? या 6 चुका पडणार महागात.

श्रेयस अय्यरमुळे दिल्ली जाणार IPL बाहेर? या 6 चुका पडणार महागात.

  • Published by:  Priyanka Gawde

दुबई, 01 नोव्हेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitlas) संघ विजयाचा प्रबळ दावेदार होता. सुरुवातीला सर्व सामने जिंकत या संघानं अव्वल स्थान गाठले होता. मात्र आता दिल्लीची हाराकिरी सुरू आहे. दिल्लीने 13 पैकी 7 मॅच जिंकल्या असून त्यांचा 6 मॅचमध्ये पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या मोसमातला दिल्लीचा हा लागोपाठ चौथा पराभव आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीने ठेवलेलं 111 रनचं माफक आव्हान मुंबईने 14.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं.

या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर ट्रेन्ट बोल्टने दिल्लीला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. यानंतर बुमराहनंही दिल्लीला सावरू दिलं नाही. परिणामी दिल्लीचा संपूर्ण संघ 110 धावांवर गारद झाला. त्यानंतर ईशान किशनने 47 बॉलमध्ये नाबाद 72 धावा केल्या. तर, क्विंटन डिकॉकनं 26 आणि सूर्यकुमार यादवनं 12 धावा करत मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला.

वाचा-3 जागांसाठी 6 संघांमध्ये लढाई, पाहा तुमचा आवडता संघ कसा गाठणार Playoff

दिल्लीनं 9 सामन्यांत 7 सामने जिंकले होते. त्यानंतर त्यांनी सलग चार सामने गमावले. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध दिल्लीनं फॉर्ममध्ये असलेल्या एनिरक नॉर्कियाला विश्रांती दिली, हा सामना दिल्लीनं खराब गोलंदाजीमुळे गमावला.

वाचा-IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये पोहोचलेल्या मुंबईसाठी ही ठरणार डोकेदुखी?

तर, कोलकाताविरुद्ध अक्सर पटेलला केवळ एक ओव्हर देण्यात आली. तर हैदराबादविरुद्ध स्टॉयनस आणि हेटमायर यांना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. गेल्या 3 सामन्यात सलामी फलंदाजांनी केवळ 42 धावा केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीचा संघ आधीसारखी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे.

वाचा-IPL 2020 : प्ले-ऑफमध्ये मुंबईशी भिडणार ही टीम

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स 14 गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शनिवारी दोन्ही संघांनी सामने जिंकले असता, त्यांना प्लेऑफ गाठता आला असता. मात्र दोन्ही संघांना पराभवाचा फटका बसला. मुख्य म्हणजे दिल्ली आणि बॅंगलोर यांचा अखेरचा सामना एकमेकांविरुद्ध असणार आहे. त्यामुळे जो संघ जिंकेल त्याला थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल.

First published:

Tags: IPL 2020, Shreyas iyer