Home /News /sport /

IPL 2020 : मॉर्गन-त्रिपाठीची फटेबाजीही कमी पडली, दिल्लीचा कोलकात्यावर रोमांचक विजय

IPL 2020 : मॉर्गन-त्रिपाठीची फटेबाजीही कमी पडली, दिल्लीचा कोलकात्यावर रोमांचक विजय

राहुल त्रिपाठी आणि इयन मॉर्गन यांनी शेवटच्या काही ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीनंतरही कोलकात्याचा दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाला.

    शारजाह : राहुल त्रिपाठी आणि इयन मॉर्गन यांनी शेवटच्या काही ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीनंतरही कोलकात्याचा दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाला. दिल्लीने ठेवलेल्या 229 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा स्कोअर 20 ओव्हरमध्ये 210-8 एवढा झाला, त्यामुळे त्यांना 18 रनने पराभव स्वीकारावा लागला. कोलकात्याकडून नितीश राणाने 35 बॉलमध्ये सर्वाधिक 58 रन केले, तर इयन मॉर्गनने 18 बॉलमध्ये 44 रन आणि राहुल त्रिपाठीने 16 बॉलमध्ये 36 रनची खेळी केली. दिल्लीच्या एनरिच नोर्टजेला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. हर्षल पटेलला 2 आणि रबाडा, स्टॉयनिस, अमित मिश्राला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. आयपीएलच्या या मॅचमध्ये कोलकात्याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण दिल्लीने कोलकात्याच्या बॉलिंगची पिसं काढली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने 38 बॉलमध्ये 88 रन केले. ओपनर पृथ्वी शॉ 41 बॉलमध्ये 66 रन करुन माघारी परतला. ऋषभ पंतने 17 बॉलमध्ये 38 रन करुन दिल्लीला मोठ्या धावसंख्येपर्ययंत पोहोचवायला मदत केली. कोलकात्याकडून आंद्रे रसेलला 2 विकेट तसंच नागरकोटी आणि चक्रवर्तीला 1-1 विकेट मिळाली. कोलकात्याविरुद्धच्या या विजयासोबतच दिल्लीने पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर धडक मारली आहे. दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या 4 मॅचपैकी 3 मॅच जिंकल्या आहेत, तर एका मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर कोलकात्याची टीम पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी 4 पैकी 2 मॅच जिंकल्या आणि 2 मॅचमध्ये पराभव स्वीकारला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या