स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 DC vs KXIP: पहिल्या सामन्याआधी भलत्याच मूडमध्ये दिसला गेल, पोस्ट केला 'हॉट' VIDEO

IPL 2020 DC vs KXIP: पहिल्या सामन्याआधी भलत्याच मूडमध्ये दिसला गेल, पोस्ट केला 'हॉट' VIDEO

आजच्या सामन्यात सर्व चाहत्यांच्या नजरा असतील त्या ख्रिस गेलवर (Chris Gayle). पंजाबकडून यावर्षी गेल आणखी नवे रेकॉर्ड करण्यास सज्ज आहे. मात्र सामन्याआधी वेगळ्याच मूडमध्ये गेल दिसला.

  • Share this:

दुबई, 20 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामातील दुसरा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Delhi Capitals vs Kings XI Punjab) यांच्यात होणार आहे. आजच्या सामन्यात सर्व चाहत्यांच्या नजरा असतील त्या ख्रिस गेलवर (Chris Gayle). पंजाबकडून यावर्षी गेल आणखी नवे रेकॉर्ड करण्यास सज्ज आहे. मात्र सामन्याआधी वेगळ्याच मूडमध्ये गेल दिसला. गेल्या हंगामात धडाकेबाज फलंदाजी करणारा गेल, यावेळी मात्र वेगळ्याच अवतारात दिसत आहे. सामन्यापूर्वी गेलनं एक व्हिडीओ पोस्ट केला.

गेलनं आयपीएलमध्ये पंजाब संघाच्या सामन्याच्या एक दिवस आधी एक म्यूजिक व्हिडीओ लॉंच केला. ड्वेन ब्राव्होप्रमाणे आता गेलनं संगीतात आपला हात आजमावत आहे. गेलनं हा व्हिडीओ ब्रिटिश-भारतीय गायिका अविना शाहसोबत केला आहे.

वाचा-'हे' 3 मुंबईकर खेळाडू झाले दिल्लीकर! IPL 2020चा पहिला सामना जिंकण्यास सज्ज

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला डान्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाही. या गाण्यात जमैकन बीट्ससह इंडियनय आणि वेस्टर्न बीट्सही देण्यात आले आहेत. हा व्हिडीओ वेगवेगळ्या देशांमध्ये शूट करण्यात आला आहे.

वाचा-IPLच्या दुसऱ्याच दिवशी वाईट बातमी, भारताच्या स्टार खेळाडूला गंभीर दुखापत

वाचा-एमएस धोनीच्या नव्या लूकवर चाहते फिदा; दाक्षिणात्य अभिनेत्याशी केली तुलना

गेलनं केली जोरदार तयारी

दरम्यान युएइला पोहचल्यानंतर गेलनं आपल्या सहकार्यांबरोबर जोरदार सराव केला. गेलला आयपीएलचा किंग म्हणून संबोधले जाते. आयपीएलमध्ये सर्वात जास्त 326 षटकार मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. तर, सर्वात जास्त 175 धावा करण्याची कामगिरी करणारा गेल आयपीएलमधला एकमेव फलंदाज आहे. एका डावात गेलनं 17 षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे. तर, आयपीएलमध्ये गेलच्या नावावर 6 शतक आहे. सर्वात जलद शतक त्याने 30 चेंडूत पूर्ण केले होते.

Published by: Priyanka Gawde
First published: September 20, 2020, 3:56 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या