IPL 2020: श्रेयस अय्यरची चिंता वाढली, सलग तिसऱ्या पराभवामुळे टॉपचा संघच जाणार Playoff बाहेर?

IPL 2020: श्रेयस अय्यरची चिंता वाढली, सलग तिसऱ्या पराभवामुळे टॉपचा संघच जाणार Playoff बाहेर?

दिल्ली कॅपिटल्सला पराभव पडणार महागात, प्ले ऑफच्या रेसमधून पडू शकते बाहेर; पाहा Point Table.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) कोणते चार संघ प्लेऑफ गाठणार हे अद्याप निश्चित झाले नाही आहे. सध्या टॉपचे संघ मुंबई, दिल्ली आणि बॅंगलोर यांनी सामने गमावले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असूनही प्ले ऑफ बाहेर जाऊ शकतो. दिल्लीनं हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) झालेल्या सामना 88 धावांनी गमावला. हा दिल्लीचा सलग तिसरा पराभव आहे. हैदराबादचा हा सर्वात मोठा विजय होता. मात्र या पराभवामुळे मात्र दिल्लीची चिंता वाढली आहे.

सनरायजर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादनं 219 धावांचे बलाढ्य आव्हान दिल्लीसमोर ठेवले. मात्र दिल्लीचा संघ 131 धावांवर ऑलाआउट झाला. हैदराबादकडून ऋद्धिमान साहानं सर्वात जास्त 87 धावा केल्या. तर, दिल्लीकडून ऋषभ पंतनं सर्वात जास्त 36 धावा केल्या.

वाचा-पॉइंट टेबलमध्ये अशी केली KXIPनं ‘हेरा फेरी’, मुंबईकर खेळाडूचं ट्वीट व्हायरल

वाचा-IPL 2020 : कधी घेणार युनिव्हर्सल बॉस निवृत्ती? स्वत: दिलं उत्तर

हैदराबादचा पाचवा विजय

हा सामना हैदाराबादसाठी करो वा मरो होता. प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांन हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. हैदारबादनं आतापर्यंत 12 सामन्यात 10 गुण मिळवले आहेत. त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत.

वाचा-रोहित शर्माच्या दुखापतीबाबत आली मोठी अपडेट! हिटमॅन IPL खेळणार की नाही?

दिल्ली कॅपिटल्सचा सलग पाचवा पराभव

गुणतालिकेत टॉपवर असणारा दिल्लीचा संघ आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. 12 सामन्यात त्यांनी 5 सामने गमावले आहे. सध्या मुंबई, दिल्ली आणि बॅंगलोर तिन्ही संघ 12 गुणांवर आहेत. मात्र दिल्लीला प्ले ऑफ गाठण्यासाठी दोन सामने जिंकावेच लागतील.

Published by: Priyanka Gawde
First published: October 28, 2020, 10:37 AM IST

ताज्या बातम्या