मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Point Table: ठरलं! 'या' संघानं मुंबई इंडियन्सआधी प्ले ऑफमध्ये जागा केली पक्की, टाका Point Table वर एक नजर

IPL Point Table: ठरलं! 'या' संघानं मुंबई इंडियन्सआधी प्ले ऑफमध्ये जागा केली पक्की, टाका Point Table वर एक नजर

राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं 13 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

दुबई, 15 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) सध्या प्ले ऑफच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. सर्व संघ टॉप-4मध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. यातच एका संघानं मात्र प्ले ऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं 13 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. दिल्लीने ठेवलेल्या 162 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचे ओपनर बेन स्टोक्स आणि जॉस बटलर यांनी जलद सुरुवात करुन दिली. पण त्यांना मोठी पार्टनरशीप करता आली नाही.

गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीनं 8 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. त्यामुळे दिल्लीचा प्ले ऑफ गाठण्याचा मार्ग सुखकर झाला आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईनं 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण मिळवले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा संघ 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर चौथ्या स्थानावर कोलकाताचा संघ असता तरी हैदराबाद आणि चेन्नई संघानं प्ले ठफ गाठण्याची संधी आहे.

वाचा-IPL 2020 : पहिल्या आयपीएलमध्ये बॉल बॉय, आता दिल्लीकडून खेळतोय हा मुंबईकर

वाचा-IPL 2020 : दिल्लीची गाडी पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर! राजस्थानचा आणखी एक पराभव

पंजाबला प्ले ऑफ गाठणं अशक्य

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 7 पैकी केवळ 1 सामना जिंकला आहे. तर 6 सामने गमावले आहेत. त्यामुळे प्ले ऑफ गाठण्यासाठी त्यांना 16 गुण मिळवणे कठिण दिसत आहे. पंजाबचा या आयपीएलमधील प्रवास जवळजवळ संपत आला आहे.

First published: