मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020: बापरे बाप! 'या' गोलंदाजानं ट्रेनलाही टाकलं मागे, 156 KM/HR वेगानं केली गोलंदाजी

IPL 2020: बापरे बाप! 'या' गोलंदाजानं ट्रेनलाही टाकलं मागे, 156 KM/HR वेगानं केली गोलंदाजी

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात दिल्ली (Delhi Capitals)ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीचा 13 रनने विजय झाला.

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात दिल्ली (Delhi Capitals)ची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राजस्थान (Rajasthan Royals)विरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीचा 13 रनने विजय झाला.

दक्षिण आफ्रिकेचे दोन गोलंदाज सध्या आघाडीवर आहे. एक म्हणजे कगिसो रबाडा (kagiso Rabada) आणि एनरिक नॉर्किया (Anrich Nortje).

  • Published by:  Priyanka Gawde
दुबई, 15 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) फक्त फलंदाज नाही तर गोलंदाजही जबरदस्त कामगिरी करत आहेत. यात दक्षिण आफ्रिकेचे दोन गोलंदाज सध्या आघाडीवर आहे. एक म्हणजे कगिसो रबाडा (kagiso Rabada) आणि एनरिक नॉर्किया (Anrich Nortje). नॉर्किया आपल्या गतीसाठी ओळखला जातो. त्यानं आयपीएलमध्ये जलद गोलंदाजी करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. काल झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात नॉर्कियानं दिल्लीकडून 156.2 किलोमीटर ताशी वेगानं चेंडू टाकला. यासह नॉर्कियानं डेल स्टेनचा रेकॉर्ड मोडला. याआधी स्टेननं आयपीएलमध्ये 154.4 किलोमीटर ताशी वेगानं गोलंदाजी केली होती. वाचा-'या' संघानं मुंबई इंडियन्सआधी प्ले ऑफमध्ये जागा केली पक्की सगळ्यात जलद चेंडू दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना बुधवारी नॉर्कियानं तिसऱ्या ओव्हरमध्ये आयपीएलमधला सर्वात जलद चेंडू टाकला. नॉर्कियानं टाकलेल्या 156.22 किमी वेगाच्या या चेंडूवर बटलरनं चौकार मारला, मात्र या चेंडूनं एक विक्रम प्रस्थापित केला. यानंतर नॉर्कियानं आणखी एक जलद चेंडू टाकला. याचा वेग 155.4 किमी ताशी वेगानं टाकला. त्यामुळे आता आयपीएलमधील सर्वात जलद चेंडू टाकण्याचा विक्रम नॉर्कियाच्या नावावर आहे. नॉर्कियानं आतापर्यंत 156.2, 155.2, 154.7, 154.2 आणि 153.7 km/hr वेगानं गोलंदाजी केली आहे. याच सामन्यात जोफ्रा आर्चरनं 153.6 किमी ताशी वेगानं गोलंदाजी केली. या दोन गोलंदाजामध्ये सर्वात जास्त जलद गोलंदाजी कोण करतं, याची जणु स्पर्धा लागली होती. वाचा-IPL 2020 : पहिल्या आयपीएलमध्ये बॉल बॉय, आता दिल्लीकडून खेळतोय हा मुंबईकर आतापर्यंतचे रेकॉर्ड आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद गोलंदाजीच्या विक्रमांवर नजर टाकल्यास नॉर्किया सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर आहे डेल स्टेन. पाचव्या क्रमांकावर कगिसो रबाडा आहे. 1.एनरिक नॉर्किया – 156.2kmph 2. एनरिक नॉर्किया – 154.8kmph 3. डेल स्टेन – 154.4kmph 4. एनरिक नॉर्किया– 154kmph 5.कगिसो रबाडा – 153.9kmph
First published:

पुढील बातम्या