Home /News /sport /

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक झटका, तब्बल 1 आठवडा खेळणार नाही 'हा' स्टार खेळाडू!

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक झटका, तब्बल 1 आठवडा खेळणार नाही 'हा' स्टार खेळाडू!

दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा झटका बसला आहे. रविवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishab Pant) खेळू शकला नाही.

  नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) सध्या सर्व संघांमध्ये प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे. यातच दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मोठा झटका बसला आहे. रविवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्लीचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishab Pant) खेळू शकला नाही. मात्र ऋषभ तब्बल एक आठवडा खेळू शकणार नसल्याचे कर्णधार श्रेयस अय्यरनं सांगितले. अय्यरनं दिलेल्या माहितीनुसार, पंतला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात वरुण अॅरॉनचा कॅच घेताना पंतला दुखापत झाली. त्यानंतर रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात पंत ऐवजी रहाणेला संघात जागा देण्यात आली. अय्यर म्हणाला की, "मी डॉक्टरांशी बोललो आहे. पंतला एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मला विश्वास आहे की, पंत जोरदार कमबॅक करेल". वाचा-IPL 2020 : तगड्या दिल्लीवर मुंबई भारी! पॉईंट्स टेबलमध्येही रोहितची टीम अव्वल
  यंदाच्या आयपीएलमध्ये पंतचे प्रदर्शन पंत दिल्लीकडून सर्वात जास्त धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. पंतने आतापर्यंत 35.20च्या सरासरीनं 6 सामन्यात 176 धावा केल्या आहेत. एकाही सामन्यात अर्धशतकी खेळी पंतला करता आलेली नाही आहे. मात्र असे असले तरी दिल्लीसाठी हा मोठा झटका असणार आहे. दिल्लीकडून मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली होती. रहाणे 15 धावा करत बाद झाला.
  वाचा-रोहित शर्मासोबत तुलना, पाकिस्तानचा क्रिकेटपटू म्हणतो... आयपीएलमध्ये कोणत्या स्थानी आहे दिल्ली? या हंगामात दिल्लीनं चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे कॅपिटल्स विजयाचे दावेदार आहेत. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांचा मुंबईने 5 विकेटनं पराभव केला असला तरी, गुणतालिकेत दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. दिल्लीनं 7 पैकी 5 सामने जिंकले आहे. त्यांच्याकडे 10 गुण आहेत. तर मुंबई इंडियन्सनेही 7 पैकी 5 सामने जिंकले आहे. मात्र मुंबईचा रनरेट दिल्लीपेक्षा जास्त आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या