स्पोर्ट्स

  • associate partner

गब्बर इज बॅक! सलग दोन सामन्यात शतकी खेळी करत शिखर धवननं नावावर केला रेकॉर्ड

गब्बर इज बॅक! सलग दोन सामन्यात शतकी खेळी करत शिखर धवननं नावावर केला रेकॉर्ड

सलग दोन सामन्यात शतकी खेळी करत आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे.

  • Share this:

दुबई, 21 ऑक्टोबर : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स उत्तम कामगिरी करत आहे. पॉईंट्स टेबलमध्येही दिल्लीचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. संघातील सर्वच खेळाडू उत्तम कामगिरी करत असून सलामीवीर शिखर धवननं सलग दोन सामन्यात शतकी खेळी करत आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे. पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात धवननं 61 बॉलमध्ये नाबाद 106 धावा केल्या. यामुळे दिल्लीला समाधानकारक धावसंख्या उभी करण्यास मदत झाली. दिल्लीने या सामन्यात 164 धावा केल्या होत्या. पण महत्त्वाचं म्हणजे यातील 106 धावा शिखर धवननं केल्या तर बाकीच्या पाच खेळाडूंनी 55 चेंडूत केवळ 56 धावा केल्या.

धवन याने या सामन्यात शतक झळकावण्याबरोबरच आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला. हा कारनामा करणारा तो पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर आयपीएल स्पर्धेत सलग दोन सामन्यांत शतक झळकावणारा धवन पहिला खेळाडू ठरला आहे. धवनला चाहते प्रेमाने गब्बर म्हणतात. शोले चित्रपटातल्या गब्बरसिंग डाकूवरून हे नाव त्याला मिळालं आहे. त्याच्या कामगिरीमुळे चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या गब्बरवर कौतुकाचा वर्षाव करून सोशल मीडियात प्रतिक्रियांचा पूरच आणला.

वाचा-4 4 6 4 6 Wd 1! पाचव्या ओव्हरमध्ये गोलंदाजाकडे बघत बसला श्रेयस अय्यर, पाहा VIDEO

वाचा-IPL 2020 जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला मोहम्मद कैफचा कानमंत्र, म्हणाला...

एवढेच नाही तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही धवनचे कौतुक केले.

वाचा-पंजाबच्या विजयी हॅट्रिकनं वाढवली 4 संघांची चिंता, टाका Point Tableवर एक नजर

मंगळवारी झालेल्या सामन्यानंतर पंजाब संघाचे आता 8 गुण झाले आहेत. पंजाबने 10 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत, तर 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर दिल्ली मात्र पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दिल्लीने 10 पैकी 7 सामने जिंकले असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 21, 2020, 2:53 PM IST

ताज्या बातम्या