दुबई, 20 सप्टेंबर : दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील पहिल्या सामन्यात चौकार, षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. दिल्लीनं 20 ओव्हरमध्ये 157 धावा करत पंजाबला 158 धावांचे आव्हान दिले. मात्र एक वेळ अशी होती, जेव्हा दिल्लीला 130चा टप्पा पार करणंही कठिण होतं. मात्र जॉर्डनच्या 20व्या ओव्हरनं मॅचचे रुप बदललं.
आघाडीचे सर्व फलंदाज अयशस्वी झाल्यानंतर मार्कस स्टायनसनं (mark Stoinis) दिल्लीचा डाव सावरला. जॉर्डनच्या (Chris Jordan) 20 ओव्हरमध्ये स्टायनसननं तब्बल 30 धावा काढल्या. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू व्हाइड झाला. त्यानंतर सलग 3 चौकार मारत आणखी एक षटकार लगावला. अखेरचा चेंडूही जॉर्डननं नो बॉल टाकला, त्यामुळे आणखी एक अतिरिक्त धाव दिल्लीला मिळाली. यासह स्टायनसनं 20 चेंडूत 52 धावा केल्या. जॉर्डननं 4 ओव्हरमध्ये 14.0च्या सरासरीनं 56 धावा दिल्या.
वाचा-विराटच्या फेव्हरेट फलंदाजानं दिला श्रेयस अय्यरला धोका, फक्त एक चौकार मारून बाद
FIFTY!@MStoinis puts up a splendid show here in Dubai with a fine half-century off 20 deliveries.
Just what the @DelhiCapitals needed #Dream11IPL pic.twitter.com/SJDlFLbRG5
— IndianPremierLeague (@IPL) September 20, 2020
दुसरीकडे पंजाबच्या इतर गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीचे आघाडीचे फलंदाज टिकू शकले नाही. शमीनं 4 ओव्हरमध्ये केवळ 15 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, कॉटरलनं 2 विकेट घेतल्या. त्याचबरोबर पदार्पण करणाऱ्या रवी बिश्नोईनं 4 ओव्हरमध्ये 22 धावा देत एक विकेट घेतली.
"Stuck to my strength, which is hitting straight."
- Marcus Stoinis
RT if you absolutely loved that knock by @MStoinis 😍#DCvKXIP #Dream11IPL #IPL2020 #YehHaiNayiDilli
— Delhi Capitals (Tweeting from 🇦🇪) (@DelhiCapitals) September 20, 2020
वाचा-पंजाबनं 2 कोटींना विकत घेतलेल्या 'युवा कुंबळे'ला दिली संघात जागा
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीला चांगली सुरुवात मिळाली नाही. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्यात विसंगतीमुळे धवन शून्यावर धावबाद झाला. त्यानंतर लगेचच शमीनं पृथ्वी शॉला 5 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर श्रेयस अय्यरनं 32 चेंडूत 39 धावा केल्या. तर, पंतने 29 चेंडूत 31 धावा केल्या. तर, मार्कस स्टायनसनं 20 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.