'काही झालं तरी IPL खेळणार', ऑस्ट्रेलियन खेळाडूचा अजब निर्णय

'काही झालं तरी IPL खेळणार', ऑस्ट्रेलियन खेळाडूचा अजब निर्णय

एकीकडे कोरोनामुळे आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर असली तरी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मात्र आयपीएल खेळण्यास उत्सुक आहेत.

  • Share this:

सिडनी, 20 मार्च : कोरोनाचा फटका क्रिकेट विश्वालाही बसला आहे. त्यामुळं भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी काही विदेशी खेळाडू अजूनही आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नरने काही झाले तर आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्नरच्या मॅनेजरने आयपीएलचे आयोजन झाल्यास त्यात डेव्हिड नक्की खेळणार असल्याचे सांगितले. वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार आहे. याआधी वॉर्नरने आयपीएलचे अनेक सामने गाजवले आहेत.

कोरोनामुळे 29 मार्चपासून सुरू होणारा आयपीएलचा तेरावा हंगाम पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे आता ही स्पर्धा 15 एप्रिलपासून सुरू होऊ शकते. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे 17 खेळाडू भाग घेणार आहेत. एकीकडे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड खेळाडूंना परवानगी देत नसताना, वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे खेळाडू आयपीएल खेळण्यास उत्सुक आहेत.

वाचा-VIDEO : बेन स्टोक्सच्या तोंडावर पत्नीनं मारलं पाणी, पाहा पुढे काय झालं

ऑस्ट्रेलियन सरकारने कोणालाही देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी अनिश्चित काळासाठी प्रवासी बंदी जारी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन आणि मर्यादित षटकांचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच यांनी कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या परिस्थितीबद्दल, अशी परिस्थिती यापूर्वी कधीच पाहिली नव्हती, असे सांगितले. कोरोनामुळे ही स्पर्धा रद्दही होऊ शकते. अद्याप याबाबत काहीही निर्णय झालेला नाही आहे. फिंच या हंगामात मोसमात विराट कोहलीचा कर्णधार रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघात खेळणार आहे.

वाचा-क्रिकेटपटू स्वप्नात पत्नीला देतो शिव्या, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा

आयपीएलमध्ये कायमच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा राहिला आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ असो किंवा ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स असो, यांना पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. मात्र कोरोनामुळे या खेळाडूंना भारतात पाहणे कठिण होणार आहे.

वाचा-IPL मध्ये आता आणखी एक ट्वीस्ट, एप्रिलमध्ये नाही तर...

आयपीएल रद्द होणार?

कोरोनाचा परिणाम भारताच्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगवरही झाला आहे. बीसीसीआयने आयपीएलचा तेराव हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं 29 मार्चपासून सुरू होणारा हंगाम आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. कोरोनामुळे सर्व संघांनी आपले सरावही रद्द केले आहेत.

First published: March 20, 2020, 10:49 AM IST
Tags:

ताज्या बातम्या