धोनीचा 'विराट' अवतार, कॅप्टन कूलच्या रागामुळे पंचांनी बदलला निर्णय? धक्कादायक VIDEO VIRAL

धोनीचा 'विराट' अवतार, कॅप्टन कूलच्या रागामुळे पंचांनी बदलला निर्णय? धक्कादायक VIDEO VIRAL

या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि अम्पायर यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

दुबई, 14 ऑक्टोबर : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2020) 13व्या हंगामात 19वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) यांच्यात झाला. या सामन्यात CSKने हैदराबादला 20 धावांनी नमवले. या सामन्यात चेन्नईनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 ओव्हरमध्ये त्यांनी 167 धावांचे लक्ष हैदराबाद पुढे ठेवले. मात्र हे आव्हान हैदराबादला पार करता आले नाही.

चेन्नईकडून शेन वॉटसननं 42 तर अंबाती रायडूनं 41 धावांची खेळी केली. तर शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजानं 10 चेंडूत 3 चौकाआणि एक षटकार मारत नाबाद 25 धवा केल्या. याच्या जोरावर चेन्नईनं 167 धावा केल्या. CSKने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादनं 20 ओव्हरमध्ये केवळ 147 धावा केल्या. मात्र या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि अम्पायर यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-अजूनही धोनीला प्ले ऑफमध्ये जागा मिळवण्याची संधी? असा आहे Point Table

वाचा-IPL 2020 मध्ये मुंबईची कामगिरी उत्तम, जिंकण्यासाठी काय असेल रोहित शर्माची रणनीती

चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यात धोनीचा राग चाहत्यांना पाहायला मिळाला. धोनी रागवल्यानंतर पंचांनी व्हाइड बॉलचा निर्णय बदलला. धोनीच्या या रागाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र काही जणांनी धोनीच्या या रागावर टीका केली आहे.

हैदराबादच्या 19व्या ओव्हरमध्ये, शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होता. 19व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरनं (Shardul Thakur) राशिद खानला ऑफ स्टम्पच्या बाहेर यॉर्कर टाकला. यावर आधी पंच पॉल रिफेल यांनी (Paul Reiffel) व्हाइड बॉलचा इशारा देण्यासाठी हात बाहेर काढला, मात्र विकेटच्या मागे उभ्या असलेल्या धोनीचा राग पाहून त्यांनी व्हाइड बॉल दिला नाही.

वाचा-एका विकेटची किंमत 7.75 कोटी तर एक रन 18 लाखांचा! ही आकडेवारी वाचून व्हाल हैराण

धोनीच्या रागामुळे पंचांनी निर्णय बदलला की काय, अशी शंका आता चाहत्यांची उपस्थित केली आहे. दुसरीकडे हैदराबादला हरवल्यानंतर धोनीच्या संघाचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकते. गुणतालिकेत CSK सहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईनं 8 सामन्यातील 3 सामने जिंकले आहेत. CSKचा नेट रन रेट -0.390 आहे आणि 6 गुणांसह ते सहाव्या क्रमांकावर आहेत. तर परभवानंतरही हैदराबादचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 14, 2020, 10:41 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading