Home /News /sport /

IPL 2020 CSK vs RR: धोनी राव तू खास आहेस! या जबरदस्त कॅचचा VIDEO पाहून तुम्हीही हेच म्हणाल

IPL 2020 CSK vs RR: धोनी राव तू खास आहेस! या जबरदस्त कॅचचा VIDEO पाहून तुम्हीही हेच म्हणाल

या सामन्यात धोनीनं एक जबरदस्त कॅच घेत, अजूनही युवा खेळाडूंना तो टक्कर देत आहे, हे दाखवून दिले.

    अबू धाबी, 20 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानच्या युवा खेळाडूंनी अनुभवी चेन्नईला मात दिली. या पराभवासह चेन्नईला संघ गुणतालिकेत अंतिम स्थानी पोहचला आहे. चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करत केवळ 125 धावा केल्या. राजस्थाननं हे आव्हान 3 विकेट गमावत पार केले. तीनवेळा चॅम्पियन राहिलेल्या CSKला पहिल्यांदाच अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले ते धोनीच्या कॅचनं. फलंदाजीवरून ट्रोल करणाऱ्यांना धोनीनं या कॅचनं सडेतोड उत्तर दिले. राजस्थानविरुद्ध धोनी 200वा सामना खेळत होता. फलंदाजी करताना दुसरी धाव घेण्याच्या नादात धोनी धावबाद झाला. मात्र या सामन्यात धोनीनं एक जबरदस्त कॅच घेत, अजूनही युवा खेळाडूंना तो टक्कर देत आहे, हे दाखवून दिले. वाचा-धोनी होणार किंगमेकर? 7 सामन्यातील पराभवानंतरही CSKला प्ले ऑफसाठी 'एक' संधी वाचा-IPL 2020 : 'ते सुपरओव्हरचं सोडा, ही मुलगी कोण सांगा!' मिस्ट्री गर्लचं रहस्य उघड राजस्थानकडून पाचव्या ओव्हरला संजू सॅमसन स्ट्राइकवर होता. दीपक चाहर गोलंदाजी करत असताना त्याच्या तिसऱ्या चेंडूवर सॅमसन चौकार मारण्याच्या प्रयत्नात होता. मात्र धोनीनं विकेटमागे जबरदस्त कॅच घेत, शून्यावर सॅमसनला माघारी धाडले. धोनीच्या या कॅचता व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. वाचा-ठरलं! 'या' दोन संघांमध्ये होणार IPL फायनल, युवीच्या भविष्यवाणीनं घाबरली RCB मात्र फलंदाजी करताना धोनी मोठे शॉट लगावण्यास अयशस्वी झाला. धोनीनं 28 चेंडूत 28 धावा केल्या. दरम्यान, गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच चेन्नईचा संघ गुणतालिकेत अंतिम स्थानी आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघानं 10 पैकी 7 सामन्यात पराभव मिळवला आहे. मात्र CSKचा संघ गुणतालिकेत अंतिम स्थानी असला तरी, त्यांना आता एक संधी आहे. CSKचे 4 सामने शिल्लक आहेत, त्यांना या सामन्यात विजय मिळवून इतर संघाच्या खेळीवर निर्भर रहावे लागणार आहे. त्यामुळे CSKला प्ले ऑफ गाठण्यासाठी इतर संघाची गरज लागणार आहे. तर त्यांना उर्वरित 4 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या