शारजाह, 23 सप्टेंबर : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात झालेला सामना चेन्नईनं 16 धावांनी गमावला. राजस्थाननं दिलेल्या 217 धावांचे आव्हान चेन्नईला पार करता आले नाही. चेन्नईनं 20 ओव्हरमध्ये 200 धावा केल्या. मात्र हा सामना चेन्नईसा संघ जिंकू शकत होता. चेन्नईच्या पराभवाला आता कर्णधार महेंद्रसिंग धोनची (MS Dhoni) रणनीती आणि त्यांची फलंदाजी यांना जबाबदार ठरवले जात आहे. धोनीनं राजस्थाननं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना 17 चेंडूत नाबाद 29 धावांची खेळी केली, मात्र धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आला, यावरून भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनं त्याच्यावर टीका केली आहे.
217 धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईनं 58 धावांवर दोन विकेट गमावले होते. मात्र धोनीनं चौथ्या क्रमांकावर सॅम करनला फलंदाजीसाठी पाठवले. सॅम बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आला. ऋतुराज शून्यावर बाद झाला. त्यानंतर धोनी फलंदाजीसाठी येईल असे वाटत असताना केदार जाधवला आला. जाधवने 16 चेंडूत 22 धावा केल्या. जाधव बाद झाल्यानंतर धोनी आला, तोपर्यंत चेन्नईच्या हातातून सामना गेला होता. धोनीच्या या निर्णयावर गौतम गंभीरनं टीका केली आहे.
वाचा-चार दिवसात दुसऱ्यांदा विराटला ओपन चॅलेंज, आणखी एक फलंदाजाचा धमाका!
WATCH - MS Dhoni's triple sixes in the final over.
No better sight than @msdhoni hitting maximums out of the park. Presenting 3 sublime sixes from the #CSK captainhttps://t.co/5IQYDOVcPE #Dream11IPL #RRvCSK
— IndianPremierLeague (@IPL) September 22, 2020
वाचा-जगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित!
गंभीरच्या मते, धोनीनं टॉप ऑर्डरला फलंदाजी करायला हवी होती. राजस्थानकडून चेन्नईनं फक्त 16 धावांनी पराभव मिळाला, जर धोनी आधी फलंदाजीला आला असला तर, हा पराभव टाळता आला असता. धोनीनं सातव्या क्रमांकावर येत शेवटच्या ओव्हरमध्ये 3 षटकार लावले, मात्र त्याआधीच चेन्नईच्या हातून सामना गेला होता. गंभीर म्हणाला की, "धोनीनं सातव्या क्रमांकावर फलंदाजीस येणं मला पटले नाही. त्याने ऋतुराज आणि सॅमला आधी फलंदाजीस पाठवले. धोनीनं लिडरशीप दाखवायला हवी होती. 217 चे आव्हान आणि धोनी सातव्या क्रमांकावर! या मागचे कारण मला कळले नाही"
“We wanted to try Sam, Jadeja up. Towards the end, you will see senior guys stepping up but at the start of tournament we want to try things, if not, we know who can do it later. I haven't batted for a long time, and the 14-day quarantine hasn't really helped."
- MS Dhoni #RRvCSK pic.twitter.com/hboy6hYtYC
— Whistle Podu Army ® - CSK Fan Club (@CSKFansOfficial) September 22, 2020
वाचा-RR vs CSK Live : राजस्थाननं 16 धावांनी जिंकला सामना, फाफची खेळी व्यर्थ
धोनी म्हणाला-'जे केले योग्य केले'
दरम्यान, सामन्यानंतर धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचे समर्थन केले. धोनी म्हणाला की, "मी खूप काळापासून फलंदाजी केली नाही आहे. काही वेगळं ट्राय करण्याची इच्छा होती, म्हणून सॅमला आधी फलंदाजीला पाठवले. आमच्याकडे पर्याय होते, म्हणून आम्ही त्याचा वापर केला".
राजस्थानकडून राहुल तेवातियानं 3 विकेट घेत चेन्नईला आक्रमक फलंदाजीची संधी दिली नाही. तर चेन्नईकडून फाफनं 21 चेंडूत 77 धावा केल्या. मात्र फाफला चांगली साथ मिळाली नाही. धोनीनं अखेरच्या ओव्हरमध्ये सलग तीन षटकार मारले मात्र तोपर्यंत चेन्नईलं सामना गमावला होता.