स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020: फिर से माही मारेगा! तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी

IPL 2020: फिर से माही मारेगा! तब्बल 400 दिवसांनंतर पुन्हा मैदानावर दिसणार धोनी

धोनीनं अखेरचा सामना वर्ल्ड कप 2019मध्ये 9 जुलै रोजी खेळला होता, त्यानंतर तब्बल 400 दिवसांनी आज धोनी मैदानात उतरताना दिसणार आहे.

  • Share this:

दुबई, 19 सप्टेंबर : जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग इंडियन प्रीमिअर लीग 2020ला (IPL) आजपासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) यांच्यात शेख जैयाद क्रिकेट मैदानावर आज 7.30 वाजता हा सामना होणार आहे. यासह क्रिकेट चाहत्याची प्रतिक्षा संपणार आहे. केवळ आयपीएलचं नाही तर चाहत्यांना भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला खेळताना पाहता येणार आहे. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याला पुन्हा खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.

धोनीनं अखेरचा सामना वर्ल्ड कप 2019मध्ये 9 जुलै रोजी खेळला होता, त्यानंतर तब्बल 400 दिवसांनी आज धोनी मैदानात उतरताना दिसणार आहे. धोनी आज मैदानात उतरताच आपल्या नावावर एक रेकॉर्डही करणार आहे. धोनीनं आयपीएलमध्ये 190 सामने खेळले आहे. मात्र सर्वात जास्त सामने खेळण्याचा विक्रम हा CSKचा खेळाडू सुरेश रैनाच्या नावावर आहे. रैनानं आतापर्यंत 193 सामने खेळले आहेत. रैना या हंगामात खेळणार नाही आहे. त्यामुळे धोनी आपल्या नावावर एक रेकॉर्ड करू शकतो.

वाचा-Disney Hotstar VIP वर सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येईल IPL 2020, वाचा कसं

त्याचबरोबर धोनी आयपीएलमधला सर्वात यशस्वी विकेटकीपरही आहे. धोनीनं आयपीएलमध्ये 132 फलंदाजांना बाद केले आहे. 13 हंगामात तब्बल 10 वेळा चेन्नई सुपरकिंग्जचा संघ फायनलपर्यंत पोहचला आहे. मात्र आज त्यांची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. 2019 अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला पराभूत करत आयपीएल ट्रॉफी जिंकली होती, त्याचा बदला घेण्यासाठी चेन्नई सज्ज आहे.

वाचा-पहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-'काही तरी लाज ठेव'

आकड्यांमध्ये मुंबई चेन्नईवर भारी

मुंबई इंडियन्सचा संघ कायमच चेन्नईवर भारी पडला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 28 सामने झाले आहेत. त्यापैकी 17 सामने मुंबईने तर 11 चेन्नईने जिंकले आहेत. मात्र गेल्या 7 वर्षात मुंबई इंडियन्सला एकदाही आपला पहिला सामना जिंकण्यात यश आले नाही आहे. मात्र मुंबईने 10 पैकी 8 अंतिम सामन्यात चेन्नईला हरवले आहे.

वाचा-IPL: या गोलंदाजानं दिल्या 4000 धावा, आता प्रीतीला सोडून धोनीच्या टीममध्ये

मुंबईचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लिन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मिचेल मॅक्‍ग्‍लेघन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्‍ट, मोहसिन खान, प्रिंस बलवंत राय सिंह, दिग्‍विजय देशमुख, हार्दिक पांड्या, जयंत यादव, क्रुणाल पांड्या, अनुकूल रॉय, नॅथन कूल्‍टन नाइल, इशान किशन, क्विंटन डी कॉक, आदित्‍य तारे, जेम्‍स पॅटिंसन.

चेन्नईचा संघ:शेन वॉट्सन, फाफ ड्युप्लेसिस, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), केदार जाधव, रविंद्र जडेजा. ड्वेन ब्राव्हो, मिशेल सॅटनर, इमरान ताहीर, दीपक चाहर, पियूष चावला. शार्दूल ठाकूर, मुरली विजय, ऋतुराज गायकवाड, नारायण जगदेशन, मोनू कुमार, सॅम कुरन, कर्ण शर्मा, आर साई किशोर, केएल असीफ, लुंगी नग्धी, जोश हेजलवूड

Published by: Priyanka Gawde
First published: September 19, 2020, 2:38 PM IST

ताज्या बातम्या