Home /News /sport /

IPL 2020 : जुहीची कोलकात्याच्या विजयासाठी प्रार्थना, मीम्स व्हायरल

IPL 2020 : जुहीची कोलकात्याच्या विजयासाठी प्रार्थना, मीम्स व्हायरल

आयपीएल (IPL 2020)च्या गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नई (CSK)ने कोलकाता (KKR)वर थरारक विजय मिळवला. या सामन्यात बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) कोलकात्याच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसून आली.

    दुबई, 30 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या गुरुवारी झालेल्या सामन्यात चेन्नई (CSK)ने कोलकाता (KKR)वर थरारक विजय मिळवला. या सामन्यात बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) कोलकात्याच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसून आली. या सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईच्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने सिक्स मारत चेन्नईला विजय मिळवून दिला. जुही चावला या अटीतटीच्या सामन्यात आपल्या टीमला विजय मिळावा म्हणून प्रार्थना करत असताना कॅमेऱ्यात कैद झाली. अटीतटीच्या या सामन्यात चेन्नईने कोलकात्याचा पराभव करत त्यांचा प्ले-ऑफचा रस्ता अवघड करून ठेवला आहे. चेन्नई सुपर किंग्स आधीच आयपीएलमधून बाहेर पडली आहे, पण या विजयामुळे त्यांनी कोलकात्याचं गणित बिघडवलं आहे. या सामन्यात चेन्नईने कोलकत्याचे 173 धावांचे आव्हान शेवटच्या बॉलवर पूर्ण करत शानदार विजय मिळवला. रवींद्र जडेजाने या सामन्यात धडाकेबाज खेळी करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. त्याने 11 बॉलमध्ये 31 रनची महत्त्वाची खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 10 रनची गरज होती. यावेळी त्याने शेवटच्या दोन बॉलवर सलग 2 सिक्स मारत चेन्नईला विजय मिळवून दिला. कमलेश नागरकोटीच्या बॉलिंगवर त्याने हे शानदार सिक्स मारले. पण या दोन बॉलवर सिक्स मारण्याआधी कोलकाता संघाची मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला आपल्या टीमच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसली. कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर जुहीचे फोटो व्हायरल झाले आहेत. कोलकात्याच्या या पराभवामुळे राजस्थान, पंजाब आणि हैदराबादच्या प्लेऑफमधील आशा अजूनही जिवंत आहेत दरम्यान, या सामन्यात चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतकी खेळी करत 53 बॉलमध्ये 72 रन केल्या. त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजाने 11 बॉलमध्ये शानदार 31 रनची खेळी करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. या खेळीमध्ये त्याने 3 सिक्स आणि 2 शानदार फोर मारले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या