स्पोर्ट्स

  • associate partner

CSK साठी आनंदाची बातमी, एका महिन्यानंतर 'या' पुणेकर खेळाडूने कोरोनावर केली मात!

CSK साठी आनंदाची बातमी, एका महिन्यानंतर 'या' पुणेकर खेळाडूने कोरोनावर केली मात!

पहिल्याच सामन्यात CSK ने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव केला. याचबरोबर CSK संघाला आणखी एक चांगली बातमी मिळाली आहे.

  • Share this:

दुबई, 21 सप्टेंबर : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाने आयपीएलची (IPL) सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्याच सामन्यात CSK ने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव केला. याचबरोबर CSK संघाला आणखी एक चांगली बातमी मिळाली आहे. तब्बल एक महिन्यानंतर संघातील फलंदाज ऋतुराज गायकवाडचा (Rituraj Gaikwad) आयसोलेशन कालावधी संपला आहे. गायकवाडनं सरावालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सामन्यात तो मैदानावर दिसू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, CSK चा फलंदाज ऋतुराज गायकवाडनं कोरोनावर मात करत, फिट झाला आहे. याशिवाय त्यानं सरावालाही सुरुवात केली आहे. CSK संघाने ऋतुराजचा फोटो ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

वाचा-पंजाबने 'शॉर्ट रन' कॉल विरोधात केलं अपील, वाचा नियम 2.12 आहे तरी काय?

वाचा-हाच खिलाडी नंबर 1! VIDEO पाहून विजेत्याऐवजी हरलेल्या खेळाडूचंच सर्वांकडून कौतुक

CSK च्या ट्वीटमध्ये रविवारी सायंकाळी ऋतुराज सराव करताना दिसला. युएइ पोहचताच चेन्नई संघाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. यात ऋतुराजचाही समावेश होता. तब्बल एक महिना ऋतुराज आयसोलेशनमध्ये होता. गेल्या आठवड्यात त्याची दुसरी कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र आता ऋतुराज फिट झाला आहे.

वाचा-6 Wd 4 4 4 6 3! जॉर्डनच्या एका ओव्हरनं पंजाबच्या 10 खेळाडूंची मेहनत गेली वाया

ऋतुराजचे कोरोना रिपोर्ट आले निगेटिव्ह

ऋतुराजची एक टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला सराव करण्याची परवानगी देण्यात आली. BCCIच्या प्रोटोकॉलनुसार कोरोना टेस्टनंतर खेळाडूला फिटनेस टेस्टही पास करावी लागते. ऋतुराजला चेन्नई संघात सुरेश रैनाची जागा घेणारा खेळाडू मानले जात आहे. त्यामुळे ऋतुराज फिट झाल्याचा फायदा संघाला नक्कीच होईल.

Published by: Priyanka Gawde
First published: September 21, 2020, 5:02 PM IST
Tags: IPL 2020

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading