स्पोर्ट्स

  • associate partner

'कुटुंबासोबत असताना मास्क वापरत नाही', कोरोना पॉझिटिव्ह CSK खेळाडूचे 'ते' चॅट VIRAL

'कुटुंबासोबत असताना मास्क वापरत नाही', कोरोना पॉझिटिव्ह CSK खेळाडूचे 'ते' चॅट VIRAL

आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

  • Share this:

दुबई, 30 ऑगस्ट : आयपीएलची (IPL 2020) सुरुवात 19 सप्टेंबरपासून होणार आहे. मात्र त्याआधीच कोरोनाचे सावट आयपीएलच्या तेराव्या हंगामावर आले आहे. आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. याचबरोबर संघातील स्टाफही पॉझिटिव्ह आढळल्यामुळे संघाला मोठा धक्का बसला.

CSK संघाचे अधिकृत निवेदनात ट्वीट करत संघातील दोन खेळाडू आणि स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. यामध्ये भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज दीपक चाहर आणि फलंदाज ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. मात्र दीपक चाहर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर त्याचे एक चॅट समोर आले आहे. यावरून त्याला ट्रोल करण्यात आले आहे. दीपकनं एक फोटो शेअर केला होता, यात सुरेश रैनासोबत इतर खेळाडूही होते. दीपकच्या या फोटोवर त्याचा भाऊ आणि फिरकी गोलंदाज राहुल चाहरनं मास्क कुठे आहे? सोशल डिस्टन्सिंग कुठे आहे? असा प्रश्न विचारला.

वाचा-सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो दीपक आयपीएल खेळण्यासाठी युएईला जात असतानाचा आहे. यात त्याच्यासह इतर क्रिकेटपटूही दिसले. राहुलनं विचारलेल्या प्रश्नावर दीपकने, "संघाची दोनदा कोरोना चाचणी झाली असून, सर्व कोरोना निगेटिव्ह आहेत आणि आम्ही कुटूंबासोबत मास्क घालत नाही", असे उत्तर दिले.

वाचा-IPL वर कोरोनाचं संकट कायम, CSKच्या पुणेकर खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

आता या फोटो आणि कमेंटवरून सोशल मीडियावर चाहते दीपकला ट्रोल करत आहेत.

वाचा-IPL 2020 : चेन्नई सुपरकिंग्जमध्ये शिरला Corona; संपूर्ण टीम क्वारंटाईन

सुरेश रैना भारतात परतला

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडून खेळणारा सुरेश रैना (Suresh Raina) कौटुंबिक कारणामुळे युएईमधून भारतात परतला आहे. सुरैश रैना आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये सहभागी नसणार, हे निश्चित झालं आहे. रैनाच्या नात्यातील काही व्यक्तींवर प्राणघात हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर काही जण जखमी आहेत. याच कारणामुळे रैनाने आयपीएलमधून बाहेर पडत पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 30, 2020, 8:50 AM IST

ताज्या बातम्या