IPL 2020 : चेन्नईच्या संघाला आणखी मोठा झटका; रैनानंतर आता हरभजनही नाही
Chennai super kings संघाला लागलेलं ग्रहण काही सुटायची चिन्हं नाहीत. सुरुवातीला Coronavirus मग सुरेश रैनाने (suresh raina news) कौटुंबिक कारणासाठी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता CSK चा आणखी एक भरवशाचा खेळाडू स्पर्धा सोडून परत येतो आहे.
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर : या वर्षीच्या इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगामात (IPL 2020) चेन्नईच्या (Chennai super kings) संघाला लागलेलं ग्रहण काही सुटायची चिन्हं नाहीत. सुरुवातीला Coronavirus मुळे 12 टीम मेंबरना पुन्हा क्वारंटाईन व्हावं लागलं. मग सुरेश रैनाने (suresh raina news) कौटुंबिक कारणासाठी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता CSK चा आणखी एक भरवशाचा खेळाडू स्पर्धा सोडून परत येतो आहे. Chennai Super Kings चा प्रमुख गोलंदाज हरभरजन सिंगने (Harbhajan singh out from ipl 2020) आता IPL मधून खेळणार नसल्याचं सांगितलं आहे.
I have pulled out of IPL due to personal reasons: Harbhajan Singh tells PTI
हरभजन सिंगने UAE मध्ये होणारा आयपीएलचा 13 वा हंगाम आपण खेळू शकत नसल्याचं जाहीर केलं आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपण भारत सोडू शकणार नसल्याचं सांगितलं आहे. CSK चा संपूर्ण संघ गेल्याच आठवड्यात दुबईला पोहोचला. पण या संघाबरोबर हरभजन गेलेला नव्हता. तो नंतर UAE ला पोहोचेल, असं सांगण्यात येत होतं. संघ रवाना होण्यापूर्वी चेन्नईला झालेल्या पाच दिवसांच्या ट्रेनिंग कँपमध्येही हरभजन गैरहजर होता. या सरावाच्या वेळी रवींद्र जाडेजासुद्धा हजर नव्हता. पण जाडेजा आता संघाबरोबर संयुक्त अरब अमिरातीला पोहोचला आहे. हरभजनने मात्र न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Coronavirus च्या छायेखाली या वर्षी IPL भारताबाहेर खेळवण्याचा निर्णय घेतला. पण संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) IPL च्या टीम पोहोचल्या तरीही अजून स्पर्धेचं शेड्यूल (IPL 2020 schedule) जाहीर झालेलं नाही.
आयपीएल 2020 (IPL 2020) तेराव्या हंगामाला दोन आठवडे शिल्लक असताना खेळाडू माघार घेण्याचा प्रकार सुरूच आहे. याआधी चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा फलंदाज सुरेश रैनानं आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे.मलिंगानं माघार घेतल्यानंतर मुंबई संघाला मोठा झटका बसणार आहे.
मलिंगानं गेल्या हंगामात जबरदस्त गोलंदाजी करत संघाला चॅम्पियन केले होते. आता मलिंगाने माघार घेतल्यानंतर जेम्स पॅटिंसनला (James Pattinson) संधी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी सांगितले की, " जेम्स पॅटिंसन आमच्यासाठी योग्य खेळाडू आहे. त्याच्यामुळे आमची गोलंदाजी चांगली होईल. लसिथ मलिंगा मुंबईती ताकद आहे, यात काही वाद नाही. त्याची कमी आम्हाला नक्की जाणवेल. पण मलिंगाला परिवारासोबत राहायचे आहे, हे आम्ही समजू शकतो". याआधी मलिंगा 2 आठवडे आयपीएल खेळणार नाही, अशा बातम्या होत्या.