मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020: पुढच्या वर्षी धोनीकडे नसणार CSKचं कर्णधारपद? चेन्नईच्या सीईओनं केलं स्पष्ट

IPL 2020: पुढच्या वर्षी धोनीकडे नसणार CSKचं कर्णधारपद? चेन्नईच्या सीईओनं केलं स्पष्ट

आयपीएलच्या या हंगामातील धोनीचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नईला 16 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. यासह गुणतालिकेत CSK पाचव्या क्रमांकावर आहे.

आयपीएलच्या या हंगामातील धोनीचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नईला 16 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. यासह गुणतालिकेत CSK पाचव्या क्रमांकावर आहे.

यावर्षी आयपीएलमध्ये चेन्नईला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संघाचा चेहरामोहरा बदलला असेल असे अंदाज बांधले जात आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात खेळणारा चेन्नई सुपर किंग्स संघ (Chennai Super Kings) आयपीएल 2020मध्ये (IPL 2020) प्ले ऑफमध्ये जाऊ शकणार नाही हे आधीच स्पष्ट झालं आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वांत यशस्वी संघ असलेल्या CSKला यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या 13 व्या सत्रात आपले स्थान टिकवणं कठीण गेलं आहे. त्यानंतर संघ आणि विशेषत: धोनीच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. धोनीसह अनेक खेळाडूंची या हंगामात कामगिरी चांगली राहिली नाही या पार्श्ववभूमीवर पुढच्यावर्षी चेन्नई सुपर किंग्सचा चेहरामोहरा बदलला असेल असे अंदाज बांधले जात आहेत. पण चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी संघातील बदलांचे संकेत देताना अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. ‘आयपीएल 2021 च्या मोसमात महेंद्रसिंह धोनीच चेन्नई संघाचं नेतृत्व करेल, असा विश्वास विश्वनाथन यांनी व्यक्त केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. आम्ही आतापर्यंत 10 वेळा आयपीएल खेळलो आहोत या सगळ्या मोसमांत आम्ही बाद फेरी गाठली आहे. इतर कोणत्याही संघाला अशी कामगिरी जमली नाही. यंदा पहिल्यांदाच आम्हाला बाद फेरी गाठण्यात अपयश आलं पण एक वर्ष खराब गेलं याचा अर्थ आम्ही सगळं काही बदलावं असा होत नाही. विश्वनाथन यांनी संघाच्या क्षमतेवर आणि यंदाच्या कामगिरी अत्यंत स्पष्टपणे भाष्य केलं. वाचा-रोहितच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्स कसे जिंकणार IPL? संघापुढे 5 मोठी आव्हानं ते म्हणाले, ‘ यंदा आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळ केला नाही असे त्यांनी मान्य केले. ज्या सामन्यात सीएसके सहज विजय मिळवू शकत होता, त्यातदेखील आमचा पराभव झाला. त्यामुळेच आम्ही पिछाडीवर गेलो. सुरेश रैना आणि हरभजनसिंग स्पर्धेतून बाहेर पडल्याने संघातील त्याची अनुपस्थिती जाणवली तसंच काही खेळाडूंना कोरोना झाला असल्याने संघाचे संतुलन बिघडले.’ वाचा-वाढदिवशी वॉर्नरनं स्वत: ला दिलं अनोखं गिफ्ट, IPLमध्ये केली 'ही' गोष्ट चेन्नई संघाचं व्यवस्थापन आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी हे कायमच नव्या खेळाडूंवर विश्वास दाखवणं आणि त्यांना संधी देणं यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याला अनुसरूनच चेन्नईच्या सीईओंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे 2021 च्या आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखालीच चेन्नई सुपर किंग्जचा संघ मैदानात उतरेल अशी आशा निर्माण झाली आहे.
First published:

Tags: IPL 2020

पुढील बातम्या