स्पोर्ट्स

  • associate partner

BREAKING : IPL 2020 दरम्यान आली धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा मुंबईत अचानक मृत्यू

BREAKING :  IPL 2020 दरम्यान आली धक्कादायक बातमी; महान क्रीडापटू आणि कमेंटेटरचा मुंबईत अचानक मृत्यू

डीन जोन्स यांनी निवृत्तीही नेहमीच्या झोकात जाहीर केली होती. त्यानंतर ते कोच म्हणून काम करत होते. IPL 2020 साठी कमेंट्री करणाऱ्या टीमचा ते भाग होते.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : IPL 2020 सुरू असतानाच एक धक्कादायक बातमी आली आहे. IPL ची कमेंट्री करणारे ऑस्ट्रेलियाचे महान क्रीडापटू आणि आता क्रिकेट कोच आणि समालोचक म्हणून जगप्रसिद्ध झालेले क्रिकेटपटू डीन जोन्स यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झालं. ते 59 वर्षांचे होते.

आपल्या घणाघाती फलंदाजीने प्रतिस्पर्ध्याला जेरीस आणणाऱ्या डीन जोन्स यांनी निवृत्तीही नेहमीच्या झोकात जाहीर केली होती. त्यानंतर ते कोच म्हणून काम करत होते. IPL 2020 साठी कमेंट्री करणाऱ्या टीमचा ते भाग होते. भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये डीन जोन्स प्रसिद्ध होते, ते त्यांच्या टोकदार कमेंट्रीमुळे.

IPL दरम्यान त्यांचं समालोचन लोकांच्या सवयीचं झालं होतं. ते मुंबईत याच कामासाठी आले होते. याच शहरात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 1987 साली ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. त्यावेळी डीन जोन्स यांची कामगिरी महत्त्वाची ठरली.  एक दिवसीय सामन्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्यांचा नावलौकिक होता. 1989 सालची अॅशेस मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली. त्या टीममध्येही डीन जोन्स होते.

वादग्रस्त कमेंट

निवृत्ती घेतल्यानंतर त्यांची कमेंटेटर म्हणून ओळखही मोठी झाली. पण दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हशीम अमला याचा उल्लेख लिटल टेररिस्ट असा केल्याने काही दिवस त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. पण अनवधानाने हा उल्लेख झाल्याचं त्यांनी कबूल करत माफी मागितल्यानंतर ते समालोचनात परत आले.

1984 ते 1992 दरम्यान त्यांनी 52 कसोटी सामने खेळले. त्यात 11 शतकं आणि 14 अर्धशतकांसह 3631 धावा केल्या. 1984 ते 1994 दरम्यान 164 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये त्यांनी 6,068 रन केल्या. एक दिवसीय सामन्यांमध्ये 7 शतकं आणि 46 अर्धशतकं त्यांच्या नावावर आहेत. अॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली पुनरुज्जीवित झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे ते महत्त्वाचे खेळाडू ठरले. ऐन फॉर्मात असताना त्यांना टीममधून काढून टाकलं आणि त्यांनी लगेचच निवृत्ती जाहीर केली.

Published by: Manoj Khandekar
First published: September 24, 2020, 4:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading