शारजा, 27 ऑक्टोबर : टी-20 च्या जवळपास सर्वच विक्रमांबरोबर ख्रिस गेलचं (Chris Gayle) नाव जोडलेलं आहे. एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठीदेखील गेल उत्कृष्ट फलंदाज आहे. सोमवारी ख्रिस गेलने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध (KKR) फक्त 29 चेंडूत 51 धावांची तुफानी खेळत किंग्ज इलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) स्पर्धेतील सलग पाचवा विजय मिळवून दिला. 41 वर्ष वय असूनही गेलची फलंदाजी अजूनही तितकीच दमदार आहे. त्यामुळे चाहते प्रत्येक सामन्यात त्यांच्या फलंदाजीची आतुरतेने वाट पाहत असतात. कोलकाताविरुद्ध सामन्यानंतर गेल आपल्या निवृत्तीच्या योजनेबद्दल बोलला. तो म्हणाले की सध्या तो क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत नाही आहे.
वाचा-'शेर की उम्र ज्यादा है लेकिन...', पंजाबने केलं गेलचं मिर्झापूर स्टाइल कौतुक
गेलची निवृत्ती योजना
KKRविरुद्ध ख्रिस गेल आणि मनदीपसिंग यांनी दुसर्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. सामन्यानंतर ख्रिस गेलने मनदीपसिंगची मुलाखत घेतली. त्यावेळी मनदीपने गेलला म्हणाले की त्यानं क्रिकेटमधून कधीही निवृत्त होऊ नये. यावर गेल हसला आणि म्हणाला, 'तुम्ही ऐकलत हा काय म्हणाला?' माझी निवृत्ती रद्द करा, मी निवृत्ती घेत नाही. मी अजूनही तरूणांसोबत खेळत राहीन.’
वाचा-रोहित शर्माच्या दुखापतीबाबत आली मोठी अपडेट! हिटमॅन IPL खेळणार की नाही?
नॉन स्टॉप क्रिकेट
ख्रिस गेल गेल्या 21 वर्षांपासून सलग क्रिकेट खेळत आहे. 1999 मध्ये त्यानी टोरोंटो मैदानावर भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर गेल निवृत्त होत आहे असं अनेकांना वाटलं होतं. त्याला 301 क्रमांकाची जर्सी देण्यात आली होती. पण नंतर त्यानी स्वत: निवृत्त होत नसल्यांच जाहीर केलं. गेल जगभरातील टी -20 लीग खेळत आहे. गेलने 103 कसोटी सामन्यात 7 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 15 शतकांचा समावेश आहे. त्याने 301 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,480 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची 25 शतकं आहेत. जगभरातील दिग्गज खेळाडूंमध्ये गेलचा समावेश होतो. त्याची तडाखेबाज फलंदाजी पाहण्यासाठी क्रिकेटरसिक कायमच तयार असतात. अशा खेळाडूंनी कधीच निवृत्त होऊ नये असंही त्यांना वाटत असतं पण वाढतं वय ही गोष्ट आड येते. सध्यातरी गेलने निवृत्तीची इच्छा नसल्याचं जाहीर केल्यामुळे असं दिसतंय की पुढे आणखी बरीच वर्षे फॅन्सना गेलची तुफान बॅटिंग बघायला मिळणार आहे.