IPL 2020 : मुंबई इंडियन्सपेक्षा जास्त आहे CSKच्या खेळाडूंचा पगार, एकटा धोनी कमवतो 15 कोटी

IPL 2020 : मुंबई इंडियन्सपेक्षा जास्त आहे CSKच्या खेळाडूंचा पगार, एकटा धोनी कमवतो 15 कोटी

धोनी आणि कंपनीचा पगार वाचून तुम्हीही व्हाल थक्क.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13व्या सत्राकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बर्‍याच संघांतील खेळाडूंनी प्रशिक्षण सत्रात भाग घेण्यास सुरुवात केली आहे. चेन्नई संघाच्या खेळाडूंनी आपला सराव सुरू केला असून सुरेश रैना आणि अंबाती रायडू यांनी या सराव सत्रात सहभाग नोंदवला. मात्र एक गोष्ट चेन्नईच्या चाहत्यांना आनंद देणार आहे, ती म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज हा संघ इतर सर्व संघांपेक्षा जास्त खर्च करतो. कारण या संघातील खेळाडूंना सर्वात जास्त पगार आहे.

आयपीएल हंगाम खेळण्यासाठी महेंद्रसिंग धोनीला चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी किती कोटी रुपये देते हे आपल्याला माहिती नसेल तर आज आम्ही याचा खुलासा करीत आहोत. आयपीएल 2020मध्ये बऱ्याच खेळाडूला कोट्यावधी रुपये देण्यात येणार आहे. यात सर्वात जास्त पगार अर्थात धोनीचा आहे.

वाचा-IPL 2020मध्ये शुभमन गील होणार KKRचा कर्णधार? शाहरुखनं केला खुलासा

धोनीचा पगार इतका कोटी आहे

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलच्या तीन हंगामांचे विजेतेपद मिळवून दिले आहे. धोनीच्या कर्णधारपदावर जगाचा विश्वास आहे. यंदाच्या आयपीएलसाठी सीएसकेने त्याला मोठ्या रक्कमेने रिटेन केले आहे. त्यामुळे धोनीला आयपीएल 2020साठी 15 कोटी रुपये पगार मिळणार आहे, जो फक्त एक करार आहे, त्याला मॅच फी आणि बक्षिसाची रक्कम स्वतंत्रपणे मिळेल.

वाचा-‘माझ्याकडे एवढा माल आहे की तुला...’, शोएब अख्तरची सेहवागवर खालच्या पातळीची टीका

CSKच्या खेळाडूंचा पगार

1. महेंद्रसिंग धोनी: 15 कोटी

2. सुरेश रैना: 11 कोटी

3. केदार जाधव: 7.80 कोटी

4. रवींद्र जडेजा: 7 कोटी

5. पीयूष चावला: 6.75 कोटी

6. ड्वेन ब्रावो: 6.40 कोटी

7. सॅम कुरन: 5.50 कोटी

8. करण शर्मा: 5 कोटी

9. शेन वॉटसन: 4 कोटी

10. शार्दुल ठाकुर: 2.60 कोटी

11. अंबाती रायुडू: 2.20 कोटी

12. हरभजन सिंह: 2 कोटी

13. जोश हेजलवुड: 2 कोटी

14. मुरली विजय: 2 कोटी

15. फाफ डुप्लेसिस: 1.6 कोटी

16. इमरान ताहिर: 1 कोटी

17. दीपक चाहर: 80 लाख

18. लुंगी नगिडी: 50 लाख

19. मिचेल सेंटनर: 50 लाख

20. केएम आसिफ: 40 लाख

21. मोनू कुमार: 20 लाख

22. एन जगदीशन: 20 लाख

23. साई किशोर: 20 लाख

24. ऋतुराज गायकवाड़: 20 लाख

First published: January 25, 2020, 12:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading