मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020: आज अबू धाबीत येणार रसेल वादळ? CSK vs KKR सामन्यात 'या' पाच खेळाडूंवर असणार नजर

IPL 2020: आज अबू धाबीत येणार रसेल वादळ? CSK vs KKR सामन्यात 'या' पाच खेळाडूंवर असणार नजर

आजच्या सामन्यात अनेक खेळाडूंमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. यामधील टॉप 5 खेळाडूंवर आपण नजर टाकणार आहोत.

आजच्या सामन्यात अनेक खेळाडूंमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. यामधील टॉप 5 खेळाडूंवर आपण नजर टाकणार आहोत.

आजच्या सामन्यात अनेक खेळाडूंमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. यामधील टॉप 5 खेळाडूंवर आपण नजर टाकणार आहोत.

  • Published by:  Priyanka Gawde

अबू धाबी, 07 ऑक्टोबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत अव्वल येण्यासाठी दोन गुण मिळवण्याच्या प्रयत्नात असतील. चेन्नईने पंजाबला 10 विकेटने हरवल्याने संघाने चांगले पुनरागमन केले आहे. मात्र चेन्नईचा जुना खेळ चाहत्यांना अजूनपर्यंत पाहायला मिळालेला नाही. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सदेखील विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात अनेक खेळाडूंमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. यामधील टॉप 5 खेळाडूंवर आपण नजर टाकणार आहोत.

1)शेन वॉट्सन

चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू आहे. पंजाबविरुद्धच्या मागील सामन्यात त्याने 53 चेंडूत 83 धावा केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यातदेखील त्याच्याकडून अपेक्षा आहेत. वॉट्सनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 135 सामन्यांत 3710 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 4 शतकांचा आणि 20 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये देखील त्याने 92 विकेट मिळवल्या आहेत.

2)सॅम करन

या हंगामात चेन्नईने खरेदी केलेला सॅम करन महत्वाचा खेळाडू ठरला आहे. आपल्या संघासाठी जीव ओतून खेळणाऱ्या या खेळाडूला संघात जागा देत धोनीने त्याच्यावर विश्वास दाखवला. त्यानंतर त्याने देखील आपल्या खेळाने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. त्यामुळं आज कोलकाताविरुद्ध देखील त्याच्याकडून उत्तम खेळाची अपेक्षा आहे.

3) फाफ ड्युप्लेसिस

चेन्नई सुपर किंग्सच्या काही महत्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे फाफ ड्युप्लेसिस. या हंगामात तो चांगल्या फॉर्ममध्ये असून आतापर्यंत 5 सामन्यात त्याने 282 धावा केल्या आहेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यात शेन वॉटसन याच्याबरोबर केलेल्या भागीदारीमुळं त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळं आजच्या सामन्यात देखील त्याच्याकडून तशीच अपेक्षा आहे.

4) सुनील नारायण

कोलकाता नाईट रायडर्सचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सुनील नारायण जबरदस्त कामगिरी करू शकतो. सुनील नारायणनं आतापर्यंत आयपीएलमध्ये 124 विकेट घेतल्या आहेत. सर्वात कमी सरासरी असणारा आयपीएमधील तो एकमेव खेळाडू आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 6 वेळा चार विकेट आणि एकदा 5 विकेट घेतल्या आहेत.आजच्या सामन्यात त्याच्याकडून चाहत्यांना आणि संघाला देखील मोठी अपेक्षा आहे.

5) आंद्रे रसेल

आंद्रे रसेल हा कोलकाता नाईट रायडर्सचा धमाकेदार खेळाडू. या आयपीएलमध्ये त्याने अजूनपर्यंत आपला धमाका दाखवला नसून आजच्या सामन्यात सर्वांचे त्याच्याकडे लक्ष असणार आहे. आतापर्यंत 55 सामन्यात त्याने 1448 धावा केल्या आहेत. 184.69 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या आहेत.

First published: