IPL वर कोरोनाचं संकट कायम, CSK मधील पुण्याच्या खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

IPL वर कोरोनाचं संकट कायम, CSK मधील पुण्याच्या खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

IPLआधी मैदानात कोरोनाचा धिंगाणा, CSKमधील पुण्याच्या खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट: इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा सत्र सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघ अडचणीत सापडला आहे. सुरैश रैनानं कौटुंबिक कारणामुळे संघ सोडून भारतात आल्यानंतर आणखीन एक संकट समोर उभं राहिलं आहे. शुक्रवारी CSK टीममधील दीपक चहरनंतर आता आणखीन एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

CSK संघातील 11 खेळाडू क्वारंटाइन झाले होते. त्यानंतर गोलंदाज ऋतुराज गायकवाडचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर नंतर सीएसकेचा फलंदाज ऋतुराज गायकवाडलाही कोरोना झाल्यानं खळबळ उडाली आहे. हे दोन्ही खेळाडू दुबईला येण्याआधी चेन्नईत असलेल्या संघाच्या पाच शिबिराचा भाग झाले होते.

हे वाचा-मोठी बातमी! चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, IPL सोडून सुरेश रैना भारतात परतला

शानदार कामगिरीमुळे पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने एक विशेष स्थान मिळवले आहे. त्याने 21 फस्ट क्लास मॅच, 20-20 सामना खेळला आहे. टी-20 मध्ये ऋतुराजचा स्ट्राइक रेट 135.31 आहे. रैनाने IPL मधून माघार घेतल्यानंतर ऋतुराज संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू होता. ऋतुराजचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे संघाला मोठा धक्का बसला आहे.

सुरेश रैनाचीही माघार

चैन्नई सुपरकिंगचा फलंदाज सुरेश रैना कौटुंबि कारणामुळे भारतात परतला आहे. संपूर्ण IPL रैना खेळणार नसल्यानं संघाला मोठा धक्का बसला आहे. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केई विश्वनाथन यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. टीमकडू रैनाच्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य मिळेल असंही त्यांनी सांगितलं.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 29, 2020, 1:40 PM IST
Tags: cricketipl

ताज्या बातम्या