स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020: संघातील 13 सदस्य पॉझिटिव्ह, तरी CSK पत्करणार ओपनिंग मॅच खेळण्याचा धोका?

IPL 2020: संघातील 13 सदस्य पॉझिटिव्ह, तरी CSK पत्करणार ओपनिंग मॅच खेळण्याचा धोका?

4 सप्टेंबरपासून पुन्हा संघाच्या ट्रेनिंगला सुरुवात होईल. संघाचे सीइओ केएस विश्ननाथन यांनी, CSK चा संघ ओपनिंग सामना खेळण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघावर सध्या कोरोनाचे संकट आहे. चेन्नई संघातील 2 खेळाडूंसह एकूण 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर संपूर्ण संघाला क्वारंटाइन करण्यात आले होते. 13 सदस्यांमध्ये संघाचे दोन स्टार खेळाडू दीपक चाहर, ऋतुराज गायकवाड यांच्यासह गोलंदाज आणि सोशल मीडिया टीमचे काही सदस्य आहेत. आज किंवा उद्या पुन्हा या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. 4 सप्टेंबरपासून पुन्हा संघाच्या ट्रेनिंगला सुरुवात होईल. संघाचे सीइओ केएस विश्ननाथन यांनी, CSK चा संघ ओपनिंग सामना खेळण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटलं आहे.

वाचा-विराट, रोहित आणि धोनीला टक्कर देणार 'हे' 7 युवा खेळाडू! पदार्पणातच गाजवणार IPL

सर्व संघ 10 दिवसांपूर्वी युएइला पोहचले आहेत. मात्र आतापर्यंत बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही आहे. सध्या संघ, खेळाडू आणि चाहते आयपीएलच्या वेळापत्रकाची वाट पाहत आहेत. याआधी असे सांगितले जात होते की, मुंबई इंडियन्स आणि उप-विजेता संघ चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात ओपनिंग सामना होणार आहे. मात्र चेन्नई संघाचे खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर वेळापत्रकात बदल होऊ शकतो.

वाचा-विराटला मोठा झटका, सुरैश रैनानंतर आता RCBच्या गोलंदाजानं घेतली IPLमधून माघार

वेळापत्रकात होऊ शकतो बदल

चेन्नी संघाचे सीइओने दिलेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबरपासून पुन्हा संघाची ट्रेनिंग सुरू होणार आहे. चेन्नईचा संघ 19 सप्टेंबर रोजी पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज असला तरी बीसीसीआय काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे आहे. याआधी अशीही माहिती होती की ओपनिंग सामना हा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होऊ शकतो.

Published by: Priyanka Gawde
First published: September 2, 2020, 12:08 PM IST

ताज्या बातम्या