IPL 2020 : रोहितची लेक झाली चेन्नई सुपरकिंग्जची चाहती, 'Whistlepodu' स्टाईल फोटो व्हायरल

IPL 2020 : रोहितची लेक झाली चेन्नई सुपरकिंग्जची चाहती, 'Whistlepodu' स्टाईल फोटो व्हायरल

मुंबईची सर्वात मोठी फॅन आता झाली चेन्नईची चाहती. फोटो झाले व्हायरल.

  • Share this:

मुंबई, 29 ऑक्टोबर : पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएल 2020साठी 19 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्यामुळं सर्व संघमालक आणि चाहते आपल्या आवडत्या संघात कोणते खेळाडू सामिल होणार आहेत यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएलच्या इतिहासतला सर्वात यशस्वी संघ मानला जातो.

मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये चारवेळा विजेतेपदक मिळवले आहे. मुंबईला IPL चा सर्वात यशस्वी संघ बनवण्यामागे संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा मोठा वाटा आहे. IPL 2019मध्ये मुंबई संघानं चेन्नई विरोधात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि चौथ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. दरम्यान यावेळी रोहितसाठी एक लकी चार्म मैदानावर उपस्थित होती. या हंगामात रोहितची मुलगी समायरा ही स्टेडिअममधून वडिलांना चिअर करताना दिसली.

मात्र आता IPL 2020मध्ये वेगळे चित्र दिसण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स संघाचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी संघ चेन्नई सुपरकिंग्ज यांची कायम तशन असते. त्यामुळं आयपीएलच्या पुढच्या हंगामात रोहितची हीच लकी चार्म चेन्नईला सपोर्ट करताना दिसली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये रोहितची लेक चेन्नई संघाला चिअर करतेय की काय, असे चित्र दिसत आहे.

रोहित आणि त्याची पत्नी रितीका सतत आपली मुलगी समायरा हिचे फोटो शेअर करत असतो. नुकतेच रोहितने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पत्नी रितिका आणि मुलगी समायरा हिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये समायरानं पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यामुळं चेन्नईच्या चाहत्यांनी याला एडित करत चेन्नईची व्हिसलपोडूवाला फोटो एकत्र केला. हाच फोटो चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडियावर शेअर करत त्याखाली ‘रोहितची मुलगी समायरा आता CSK ची फॅन झाली आहे’, असे लिहिले.

मुंबईने गेल्या वर्षी IPL सुरू होताना समायरासाठी एक छोटी जर्सी तयार केली होती. तसेच, समायरा ही मुंबईची सर्वात मोठी फॅन आहे, असेही म्हटले होते.

पण CSK ने समायराचा दुसरा फोटो शेअर केला आहे. तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मुंबई आणि चेन्नई हे दोन संघ आयपीएलमध्ये तशन असलेले संघ मानले जातात. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईनं 4 वेळा तर चेन्नईनं 3वेळा विजेतेपदक आपल्या नावावर केले आहे. त्यामुळं आयपीएल 2020मध्ये काय चित्र दिसते हे मार्च-एप्रिलमध्ये कळेल.

Published by: Priyanka Gawde
First published: October 29, 2019, 3:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading