IPL 2020 : ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन करणारा खेळाडू आता सनरायझर्स हैदराबादला करणार मार्गदर्शन

IPL 2020 : ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन करणारा खेळाडू आता सनरायझर्स हैदराबादला करणार मार्गदर्शन

यापूर्वी हैदराबादनं इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रॅव्हर बायलिस यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते.

  • Share this:

हैदराबाद, 20 ऑगस्ट: आयपीएल 2020साठी सर्व संघांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, संघांमध्ये काही मोठे बदलही होत आहेत. यातच आता हैदराबाद संघानं ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक ब्रॅड हॅडीनची सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड केली आहे. सनरायझर्स हैदराबादनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही घोषणा केली. यापूर्वी संघाने इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रॅव्हर बायलिस यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. सिमॉन हेल्मोट यांच्या जागी आता हॅडीन सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.

ऑस्ट्रेलियानं 2015मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कप संघात ब्रॅड हॅडीन उप-कर्णधार होते. हॅडीन यांनी याआधी 2016मध्ये ऑस्ट्रेलिया ए संघाचे सहाय्यक कोच आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तर, मुख्य प्रशिक्षक बायलिस यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघाने 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. हॅ़डीनने यापूर्वी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत काम केले आहे. बायलिस हेही 2012 ते 2015 या कालावधीत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने 2012 आणि 2014मध्ये जेतेपद पटकावले. हॅडीनला 2011मध्ये कोलकाताने आपल्या चमूत दाखल करून घेतले होते.

41 वर्षीय हॅडिननं ऑस्ट्रेलियाकडून 2001 ते 2015मध्ये 66 कसोटी सामने, 126 एकदिवसीय सामने आणि 34 टी-20 सामने खेळले आहेत. त्यांच्या नावावर 6790 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. हॅडीन बिग बॅश लीगमधील सिडनी सिक्सर संघाचा कर्णधार असताना बायलिस हे प्रशिक्षक होते. या जोडीनं 2012 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले आहे.

हे दिग्गज खेळाडू असतील मार्गदर्शक

भारताचा माजी फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मण आणि दिग्गज गोलंदाज मुथैय्या मुरलीधरन संघाचे मेंटॉर आहेत. ट्रॅव्हर बायलिस संघाचे प्रशिक्षक तर, ब्रॅड हॅडीन माजी प्रशिक्षक असतील.

VIDEO: इस्रोने रचला नवा इतिहास; 7 सप्टेंबरला 'चंद्रयान-2' चंद्रावर उतरणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 01:22 PM IST

ताज्या बातम्या