दुबई, 26 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) च्या चेन्नई (CSK) विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)शिवाय मैदानात उतरली होती. रोहीत शर्माला झालेल्या दुखापतीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या आगामी सामन्यांमध्ये रोहित शर्माला खेळता येणार नाही. रोहितला झालेल्या दुखापतीमुळे तो पुढील सामने खेळू शकेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दुखापतीनंतर रोहित शर्मा कोणताही सामना खेळू शकलेला नाही. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा आहे. हिटमॅन रोहितच्या फिटनेसवर त्याचा सहकारी खेळाडू क्विटन डिकॉक (आज सकाळच्या बातमीनुसार) म्हणाला होता की रोहित खूप लवकर बरा होत आहे. मात्र तो कोणत्या सामन्यातून परतेल हे निश्चित सांगता येऊ शकत नाही. तो लवकरच बरा होईल आणि आपल्या टीमसोबत खेळाताना दिसेल. काहींनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा राजस्थान विरुद्धच्या सामन्यात वापसी करू शकतो. मात्र त्यांच्या दुखापतीमुळे नेमकं सांगता येणं अवघड आहे.
हे ही वाचा-IPL 2020 : ...म्हणून क्रिकेटपटू दोन टोप्या घालून मैदानात दिसत आहेत
मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या होत्या. या मॅचमध्ये पंजाबने मुंबईचा पराभव केला होता. या मॅचनंतर बोलताना कायरन पोलार्डने रोहित शर्माला बरं नसल्याचं सांगितलं होतं, पण त्याने रोहितच्या दुखापतीबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यानंतर चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये टॉसवेळी पोलार्डने रोहितची तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मुंबईच्या टीम प्रशासनाने रोहितच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. 'रोहित शर्माच्या डाव्या मांडीच्या मागच्या स्नायूवर ताण आला आहे. पंजाबविरुद्धच्या मॅचवेळी रोहित शर्माला ही दुखापत झाली. मागच्या 4 दिवसांमध्ये रोहितच्या दुखापतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे. बीसीसीआयची सल्लामसलत करुन आम्ही रोहितच्या दुखापतीवर प्रत्येक दिवशी देखरेख करत आहोत', असं मुंबई इंडियन्सकडून सांगण्यात आलं होतं.